मालिकांमधून घराघरात पोहोचणारे कलाकार आता मोठ्या पडद्यावर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 09:15 IST2016-02-16T16:02:53+5:302016-02-16T09:15:28+5:30

टीव्हीवरील मालिकांमधून विविध भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या मनात नकळतपणे स्वत:च्या कॅरॅक्टरची अनोखी छाप सोडून जातात. मालिकेमधील एखाद्या कलाकाराची भूमिका ...

Artists reaching out to the family through big screens .... | मालिकांमधून घराघरात पोहोचणारे कलाकार आता मोठ्या पडद्यावर....

मालिकांमधून घराघरात पोहोचणारे कलाकार आता मोठ्या पडद्यावर....

व्हीवरील मालिकांमधून विविध भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या मनात नकळतपणे स्वत:च्या कॅरॅक्टरची अनोखी छाप सोडून जातात. मालिकेमधील एखाद्या कलाकाराची भूमिका एवढी अजरामर ठरते, की त्याच नावाने त्याला प्रेक्षक ओळखू लागतात आणि तीच त्यांची खरी ओळख होऊन जाते.  मालिकेतील कलाकारांना रसिकांचे मिळणारे प्रेम इतके असते, की प्रेक्षक त्यांना नाटक, सिनेमा अशा कोणत्याही माध्यमात पाहायला उत्सुक असतात आणि त्यामुळेच, मालिकांमधून घराघरात पोहोचणारे कलाकार आता आपल्याला मोठ्या पडद्यावरदेखील पाहायला मिळत आहेत.


         स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अभिजित खांडकेकर, मृणाल दुसानीस, शशांक केतकर, प्राजक्ता माळी, वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहरे, सुयश टिळक मृण्मयी देशपांडे अशा कितीतरी कलाकारांनी मालिकांनंतर आपला मोर्चा थेट चित्रपटांकडे वळवला. शशांक केतकरची नुकतीच एक मालिका संपली असून त्याची घराघरात अजूनही श्री नावानेच ओळख कायम आहे. आता तो मोठ्या पडद्यावर वन वे टिकट या चित्रपटातून एन्ट्री करीत आहे. सचित पाटील, अमृता खानविलकर अशा स्टारकास्टसोबत शशांक लवकरच त्याच्या चाहत्यांना बिग स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे.
        अग्निहोत्र या मालिकेतून विक्रम गोखले, मोहन जोशी, अविनाश नारकर, शरद पोंक्षे या दिग्गज कलाकारांसह सिद्धार्थ चांदेकरने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याला झेंडा या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. तसेच बालगंधर्व, लग्न पाहावे करून, आॅनलाईन बिनलाईन, बावरे प्रेम हे, संशयकल्लोळ आणि क्लासमेट्स अशा चित्रपटांतून तो मोठ्या पडद्यावर झळकला. अग्निहोत्र या त्याच्या पहिल्या मालिकेत स्पृहा जोशीच्या भावाचा रोल केल्यानंतर आता त्याच्या आगामी चित्रपटात तो स्पृहाच्या हिरोची भूमिका बजावत आहे.
         वैभव तत्त्ववादीने २०१० मध्ये डिस्कवर महाराष्ट्र या टीव्ही प्रोग्रॅममधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. त्यानंतर त्याने तुझं माझं जमेना, पिंजरा या मालिकांमध्ये काम केले. फक्त लढ म्हणा, सुराज्य, कॉफी आणि बरंच काही अशा चित्रपटांतून त्याने मोठ्या पडद्यावर ठसा उमटविला. एवढेच नाही तर बॉलिवूडमध्येदेखील हंटर आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांतून त्याने पाऊल ठेवले आहे. 
         स्पृहा जोशीने तर मालिकांमधूनच तिच्या करिअरची सुरुवात केली होती.  चाईल्ड आर्टिस्ट म्हणून अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर तिने छोट्या पडद्यावरच अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका या मालिकांमधून वेगळ््या धाटणीच्या भूमिका साकारल्या. उंच माझा झोकाने तर तिला रमाबाई रानडे अशीच नवी ओळख घराघरात मिळाली. तसेच पेर्इंग घोस्ट, मोरया, बायोस्कोप या चित्रपटांतूनदेखील तिने सशक्त भूमिका साकारल्या. 
          अमर प्रेम या मालिकेतून सुयश टिळकने करिअरचा श्रीगणेशा केला. त्यानंतर त्याने टीव्हीवरील अनेक मालिंकामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. मोठ्या पडद्यावर त्याला अभिनेता म्हणून प्रमुख भूमिका करायला मिळाली नसली तरी त्याने दर्जेदार रोल चित्रपटांमध्ये केले आहेत. कॉफी आणि बरंच काही, क्लासमेट्स या चित्रपटांतून त्याने चांगले रोल्स केले आहेत. 
            अभिजित खांडकेकर, मृणाल दुसानीस, चिन्मय मांडलेकर, गौरी नलावडे, गायत्री सोहम, प्रिया मराठे या कलाकारांनीदेखील छोटा पडदा गाजविल्यानंतर चित्रपटांमध्ये सशक्त भूमिका साकारल्या आहेत. एवढेच नाही, तर स्वप्निल जोशी, प्रिया बापट, संतोष जुवेकर, मुक्ता बर्वे, मनवा नाईक हे कलाकारदेखील चित्रपट आणि मालिका अशा दोन्ही धुरा सांभाळत आहेत.
       
  मालिका असो किंवा चित्रपट मी माझ्या अभिनयाला जास्त प्राधान्य देतो. मालिकेतून तुम्ही घराघरात पोहोचता, तर चित्रपटातून काहीतरी क्रिएटिव्ह करायला मिळते. मला छोट्या पडद्याने खूप आत्मविश्वास दिला. कॉफी आणि बरंच काहीमधील रोल मला खूप आवडल्याने तो करण्यास मी तयार झाले, तर क्लासमेट्समध्ये सर्वात शेवटी माझी कास्टिंग झाली. माझ्या आवडत्या कलाकारांसह काम करण्याची संधी मला या चित्रपटात मिळाली.
                                      - सुयश टिळक

   मी माझ्या करिअरची सुरुवातच चाईल्ड अ‍ॅक्टर म्हणून मालिकांतून केली. मला खरी ओळख मालिकांमधूनच मिळाली आहे. टेलिव्हिजनमुळे मिळणारी पॉप्युलॅरिटी फार महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांपर्यंत अगदी घराघरांत पोहोचता. उमेश आणि सिद्धार्थ यांच्याबरोबर मी मालिकांमध्ये काम केले असल्याने नाटक किंवा चित्रपटात काम करताना आमची ट्युनिंग खूप चांगली होती. 
                                        - स्पृहा जोशी
 

Web Title: Artists reaching out to the family through big screens ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.