या कलाकाराला एका कॉमेडी शोसाठी स्पेनमध्ये द्यावे लागले ऑडिशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 14:15 IST2017-11-21T08:44:03+5:302017-11-21T14:15:35+5:30
कोणत्याही शोमध्ये एंट्री होण्यासाठी ऑडिशन द्यावी लागते हे आपण ऐकलेले आहे. विविध कॉमेडी शोमध्ये आलेल्या कलाकारांना ऑडिशन देऊन स्वतःला ...
.jpg)
या कलाकाराला एका कॉमेडी शोसाठी स्पेनमध्ये द्यावे लागले ऑडिशन!
क णत्याही शोमध्ये एंट्री होण्यासाठी ऑडिशन द्यावी लागते हे आपण ऐकलेले आहे. विविध कॉमेडी शोमध्ये आलेल्या कलाकारांना ऑडिशन देऊन स्वतःला सिद्ध करावं लागतं. संगीत रिअॅलिटी शोबाबतही उद्योन्मुख गायकांना आपल्या सूरांची जादू ऑडिशनमध्ये दाखवावी लागते. या ऑडिशनमधील परफॉर्मन्सवरच त्यांची शोमधील पुढच्या प्रवासासाठी वर्णी लागते. ‘जमाई राजा’ या छोट्या पडद्यावर गाजलेल्या मालिकेतील एका अभिनेत्यालाही ऑडिशन द्यावे लागले होते. ऑडिशनमुळेच त्याची एका कॉमेडी शोमध्ये वर्णी लागली. हे वाचून तुम्हाला नवल वाटलंच असेल. कारण नव्या कलाकारांना ऑडिशनची गरज भासत असून प्रस्थापित कलाकारांना ऑडिशन द्यावी लागत नाही. मात्र जमाईराजा फेम अभिनेता रवी दुबेबाबत असाच एक ऑडिशनचा खास किस्सा आहे. त्याला 'एंटरटेन्मेंट की रात' या शोसाठी चक्क स्पेनमध्ये ऑडिशन द्यावी लागली. आता ऑडिशन आणि ते ही स्पेनमध्ये ही काय भानगड आहे असा प्रश्न पडणंही साहजिकच आहे. त्याचा एक मजेशीर किस्सा नुकताच एंटरटेन्मेंट की रात या कॉमेडी शोमध्ये ऐकायला मिळाला. जमाईराजा मालिकेनंतर अभिनेता रवी दुबे हा खतरों के खिलाडी सीझन-8मध्ये सहभागी झाला होता. रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेला खतरो के खिलाडींचा हा सीझन स्पेनमध्ये पार पडला. या शोमध्ये सहभागी सेलिब्रिटींना एकाहून एक खतरनाक स्टंट करावे लागले. त्याच सेलिब्रिटींमध्ये रवी दुबेसुद्धा होता. त्यालाही हे सगळे स्टंट करावे लागले. मात्र स्टंट करता करता रवी दुबेची एक खास बात सा-यांना अनुभवायला मिळाली.स्टंटचं टेन्शन येऊ नये आणि स्पेनमध्ये शूटिंगच्या ठिकाणी हलकं फुलकं वातावरण निर्माण व्हावं यासाठी रवी दुबे आपल्या सहका-यांचं मनोरंजन करत असे. विविध कलाकारांची मिमिक्री करण्यात तो पटाईत होता. सगळ्यांच्या नकला करत रवी दुबेने आपल्या सहका-यांसह रोहित शेट्टी आणि क्रू मेंमबर्सना हसून हसून लोटपोट केलं. अशा हसत खेळत वातावरणात खतरों के खिलाडीचा सीझन संपला. मात्र शोमधील रवी दुबेची मिमिक्री सा-यांच्या लक्षात राहिली. सध्या रवी दुबे एंटरटेन्मेंट की रात या कॉमेडी शोमध्ये झळकत आहे. या शोमध्येही सा-यांना हसवण्याचं आणि मनोरंजन करण्याचं काम मोठ्या खुबीने करत आहे. त्यावेळी त्याचे सहकारी त्याला गंमतीने म्हणतात की स्पेनमध्ये पार पडलेल्या खतरों के खिलाडीमुळेच त्याची या शोमध्ये वर्णी लागली. स्पेनमध्ये पार पडलेल्या त्या शोमध्ये मिमिक्री आणि नकला करत एकप्रकारे रवी दुबेने एंटरटेन्मेंट की रात या कॉमेडी शोसाठी ऑडिशन दिल्याचे त्याचे सहकारी सांगतात. आता अभिनेता असलेला रवी दुबे मिमिक्री आणि नकलाकार म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण करु लागला आहे. त्यामुळे तुमची एखादी कला कुठे वेगळीच संधी देऊन जाईल हे सांगता येत नाही हेच रवी दुबेच्या मिमिक्रीने सिद्ध केले आहे.
![]()