​हा कलाकार धावून आला आपल्या सहकलाकाराच्या मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 10:53 IST2016-11-10T10:53:20+5:302016-11-10T10:53:20+5:30

गोठ या मालिकेच्या सेटवर नुकतीच एक भन्नाट गोष्ट घडली. कलाकार मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने एकमेकांसोबत खूप वेळ घालवत असतात. त्यामुळे ...

The artist came running to help his co-actors | ​हा कलाकार धावून आला आपल्या सहकलाकाराच्या मदतीला

​हा कलाकार धावून आला आपल्या सहकलाकाराच्या मदतीला

ठ या मालिकेच्या सेटवर नुकतीच एक भन्नाट गोष्ट घडली. कलाकार मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने एकमेकांसोबत खूप वेळ घालवत असतात. त्यामुळे त्यांच्यात एक आपुलकीचे नाते निर्माण होते. आपल्या सहकलाकारासाठी काहीही करायला ते तयार असतात. याचाच प्रत्यय गोठ या मालिकेच्या सेटवर नुकताच आला.
कलाकारासाठी व्यक्तिरेखेत कन्टिन्युटी राखणे हे खूप महत्त्वाचे असते. मालिका पाहाताना तर कन्टिन्युटी नसल्यास प्रेक्षकांच्या ते लगेचच लक्षात येते. गोठ या मालिकेत पद्याची भूमिका साकारणारा शेखर बेटकर हा सेटवर आला, तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आले की त्याचे केस कन्टिन्यूटीप्रमाणे नाहीत. शेखरला मालिकेच्या चित्रीकरणातून काही दिवसांचा ब्रेक मिळाला असल्याने त्याने छानसा हेअरकट केला होता. पण या हेअरकटमुळे तो त्याच्या व्यक्तिरेखेच्या नेहमीच्या लूकपेक्षा वेगळा दिसत होता आणि त्याच्यातच कन्टिन्यूटीमध्ये ही गोष्ट लगेचच लक्षात येत होती. शेखरला कोणत्यातरी सलूनमध्ये नेऊन त्याचे केस व्यवस्थितपणे कापून आणण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. पण या सगळ्या गोष्टीसाठी खूप वेळ जाणार होता आणि यामुळे मालिकेच्या संपूर्ण टीमचा खोळंबा होणार होता. त्यामुळे हा वेळ वाचवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे सगळ्यांना वाटत होते. यामुळे या मालिकेत विलासची भूमिका साकारणाऱ्या समीर परांजपेने शेखरचे केस कापायचे ठरवले. समीरला केस कापता येईल की नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पण समीरने अतिशय चांगल्याप्रकारे केस कापून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. यामुळे सगळ्या टीमचा वेळ तर वाचला सोबत शेखरला पैसे न देता केसही कापून मिळाले. 

Web Title: The artist came running to help his co-actors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.