अर्शदने स्वीकारले 'हे' आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 11:36 IST2017-05-18T06:06:57+5:302017-05-18T11:36:57+5:30

सबसे बडा कलाकार या कार्यक्रमात लहान मुले दिवसंदिवस एकापेक्षा एक बहारदार परफॉर्मेन्सस सादर करत सगळ्यांची मनं जिंकत आहेत. या ...

Arshad accepted the challenge | अर्शदने स्वीकारले 'हे' आव्हान

अर्शदने स्वीकारले 'हे' आव्हान

से बडा कलाकार या कार्यक्रमात लहान मुले दिवसंदिवस एकापेक्षा एक बहारदार परफॉर्मेन्सस सादर करत सगळ्यांची मनं जिंकत आहेत. या कार्यक्रमात रवीना टंडन. अर्शद वारसी आणि बोमन इराणी आपल्याला परीक्षकांच्या भूमिकेत दिसतायेत. या कार्यक्रमातील लहान स्पर्धकांनी आपल्या डान्स आणि अभिनयाच्या जोरावर हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. नुकतेच या कार्यक्रमात सुपर डान्सर मासूम  हिने परीक्षक अर्शद वारसी याला तिच्यासारखे नृत्य करण्याचे आव्हान दिले. एक डान्सर, नृत्य दिग्दर्शक आणि पूर्वी जिम्नॅस्ट आसलेल्या अर्शद वारसीने हे आव्हान आत्मविश्वासाने स्वीकारले. अर्शदने  व्हेव्ह आव्हान स्वीकारले पण तो ते करु शकला नाही तर त्याऐवजी त्यांने कार्टव्हीला केले. अर्शदने सांगितले की जवळपास 30 वर्षांनंतर त्याने कार्टव्हील केले आहे. कार्टव्हील सादर करताना आपण पुन्हा एकदा 90च्या दशकात जाऊन पोहोचल्याचे अर्शदने म्हटले आहे.  

काही दिवसांपूर्वीच सबसे बडा कलाकारच्या सेटवर अर्शदला फॅशनसंबंधी सल्ला देण्यात आला होता. तान्या आणि तनिशा या जुळ्या बहिणींनी अर्शदला आपल्या मानेभोवती टॉवेल न गुंडाळण्याचा सल्ला दिला होता. अर्शद मानेभोवती गुंडाळत असलेला मफलर त्याला शोभत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यावर अर्शदने त्यांना गंमत म्हणून आंघोळ केल्यानंतर आपण टॉवेल काढायला विसरलो असल्याचे म्हटले होते. सबसे बडा कलाकारमधील स्पर्धक आपल्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली परफॉर्मन्स सादर करत आहेत. त्यांचे परफॉर्मन्स पाहून प्रेक्षकांसह परीक्षक ही थक्क होऊन जातात. या मुलांमधील एनर्जी ही पाहण्यासारखी असते. या चमुकल्यांमध्ये अभिनय, नृत्य आणि नाट्याची प्रतिमा ठासून भरलेली आहे. 

Web Title: Arshad accepted the challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.