कनिका कपूर आहे अरमान मलिकवर फिदा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 16:42 IST2019-03-18T16:40:28+5:302019-03-18T16:42:28+5:30
या कार्यक्रमाच्या या भागाच्या चित्रीकरणादरम्यान कनिका म्हणाली, “माझ्या दृष्टीने अरमान मलिका हा सर्वात देखणा पुरुष आहे.

कनिका कपूर आहे अरमान मलिकवर फिदा !
‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या गाण्यांच्या रिअॅलिटी कार्यक्रमातील गायक स्पर्धक आणि त्यांच्या प्रशिक्षकांमधील नाते इतके जुळले आहे की त्यांना एकत्र काम करताना पाहून प्रेक्षकांना वेगळाच आनंद मिळतो. तसेच यातील प्रशिक्षकांमध्येही एक खूपच सामंजस्याचे नाते निर्माण झाले आहे. विशेषत: कनिका कपूर आणि अरमान मलिक यांच्यात मंचावर आणि पडद्यमागेही एक जवळचे नाते तयार झाल्याचे दिसते. या कार्यक्रमाच्या एका भागात कनिकाने अरमानला ‘सर्वात देखणा पुरुष’ म्हणून म्हटले आहे.
या कार्यक्रमात कनिका आणि अरमान यांच्यात चाललेले मिश्किल आणि मजेदार संवादांमुळे प्रेक्षकांची छान करमणूक होताना दिसते. अलीकडेच कनिकाने तिच्या या सहप्रशिक्षकाला सर्वात देखण्या पुरुषाचा किताब देऊन त्यंच्यातील स्नेहपूर्ण नात्याचे दुर्मिळ दर्शन घडविले होते. या कार्यक्रमाच्या या भागाच्या चित्रीकरणादरम्यान कनिका म्हणाली, “माझ्या दृष्टीने अरमान मलिका हा सर्वात देखणा पुरुष आहे. आपलं आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि प्रमाणिकपणा घेऊन तो किती सहजतेने वावरतो.”
‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील प्रशिक्षकांमध्ये प्रेम आणि सहकार्याचे नाते निर्माण झाले आहे. यातील स्पर्धकांकडून होणारे गाण्याचे अप्रतिम सादरीकरण आणि त्यांना लाभणारे या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन हा प्रेक्षकांसाठी एक आगळाच अनुभव आहे.