सना शेख शिवाय 'कृष्णदासी' पर्व 2 येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 17:13 IST2016-10-27T16:44:13+5:302016-10-27T17:13:30+5:30
'कृष्णदासी' या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे पुन्हा एकदा ही मालिका रसिकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृष्णदासीचा पर्व 2 लवकरच ...

सना शेख शिवाय 'कृष्णदासी' पर्व 2 येणार?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">'कृष्णदासी' या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे पुन्हा एकदा ही मालिका रसिकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृष्णदासीचा पर्व 2 लवकरच सुरू होणार असल्याचे या मालिकेचे निर्माते विपुल डी शहा यांनी ट्वीट करून ही माहिती दिलीय. या मालिकेच्या पहिल्या पर्वात सना शेख मुख्य भूमिकेत होती. याविषयी तिला विचारण्यात आले असता तिने सांगितले की 'कृष्णदासीच्या पर्व 2' साठी मला विचारण्यात आलेले नाही त्यामुळे या मालिकेत पुन्हा एकदा सनाच्या जागी दुस-या अभिनेत्रीचीच वर्णी लागल्याचे दिसतेय. कृष्णादासीच्या पहिल्या पर्वात रसिकांकडून सना शेखने साकारलेल्या भूमिकेच विशेष कौतुक झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सना मालिकेच्या दुस-या पर्वात सना असणार असल्याचे तिला खात्री होती. मात्र मालिकेत सनाच्रया जागी दुस-या अभिनेत्रीचीच वर्णी, लागली असल्याचे कळतेय. मालिकेची कथा इंद्र सौंदराजनच्या कांदबरीवर आधारित असून यात देवदासी प्रथेवर भाष्य करण्यात आले होते. 'इंद्र सौंदराजन' याच नावाने तामिळ भाषेतही मालिका होती. त्याचाच हिंदी रिमेक म्हणून 'कृष्णदासी' मालिका सुरू करण्यात आली. कृष्णदासी मालिकेच्या पहिल्या पर्वात सना शेख ही एक कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थीनी असते. ती देवदासी या कुप्रथेवर आवाज उठवते. अशा प्रकारे कथा रंगवण्यात आली होती. नव्याने सुरू होणा-या मालिकेत देवदासी या कुप्रेथेचे कोणते पैलू उलगडण्यात येतील याविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.