लग्नानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीकडे नाहीय वेळ, करण जोहरची ऑफर नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 14:31 IST2018-02-12T07:34:12+5:302018-02-12T14:31:03+5:30

विराट आणि अनुष्का यांनी लग्नानंतर स्वतःला मीडिया पासून दूरच ठेवले. त्या दोघांचे फॅन्स सुद्धा त्यांना एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत, ...

Anushka Sharma and Virat Kohli did not have the time to get married, Karan Johar's offer was rejected | लग्नानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीकडे नाहीय वेळ, करण जोहरची ऑफर नाकारली

लग्नानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीकडे नाहीय वेळ, करण जोहरची ऑफर नाकारली

राट आणि अनुष्का यांनी लग्नानंतर स्वतःला मीडिया पासून दूरच ठेवले. त्या दोघांचे फॅन्स सुद्धा त्यांना एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत, नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार विराट आणि अनुष्का करण जोहरच्या पॉप्युलर चॅट शो "कॉफी विथ करण" मध्ये येणार आहेत पण अजूनपर्यंत या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला नाही. 

अनुष्का शर्माच्या मॅनेजरने एक चॅनलशी बोलताना सांगितले की, ''विराट आणि अनुष्का करण जोहरच्या शोमध्ये नाही येणार आहे ही बातमी निव्वळ एक अफवा आहे. खरंतर  सूत्रानुसार बातमी अशी मिळाली होती की अनुष्का आपला चित्रपट  'परी' च्या प्रमोशनसाठी चित्रपटाची निर्माती प्रेरणा आरोडा सोबत ह्या शोमध्ये दिसेल आणि तेव्हाच विराट त्या दोघींना साथ देईल पण अनुष्काच्या मॅनेजरने ही बातमी चुकीची असल्याचे सांगितले आहे.

अनुष्काचा येणारा चित्रपट "परी"मध्ये  ती भयंकर रुपात दिसते आहे,  फिल्लोरी चित्रपटानंतर दुसऱ्यांदा अनुष्का भुताची भूमिका साकारतेआहे. पहिल्या चित्रपटात तिने भूत बनून लोकांना हसवले पण "परी"मध्ये ती लोकांना घाबरवण्याचे काम करणार आहे.  टीजरमध्ये ज्यापद्धतीने अनुष्काचे रूप दाखविण्यात आले त्यावरून तिच्या भूमिकेची गंभीरता लक्षात येते. कारण आतापर्यंत कधीही बघितला नसेल अशा अवतारात अनुष्का दिसत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांकडून तिच्या या नव्या अवताराला पसंतीही मिळत आहे.  एक निर्माता म्हणून अनुष्काचा हा तिसरा चित्रपट आहे. या अगोदर तिच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत ‘एनएच१०’ आणि ‘फिल्लौरी’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. दरम्यान, ‘परी’मध्ये तिच्यासोबत परमब्रता चॅटर्जीचीही मुख्य भूमिका आहे, तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रॉसी रॉय यांनी केले आहे. परी हा चित्रपट २ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

अनुष्काने शाहरुख खानसोबत झिरो चित्रपटाची शूटिंग तर वरुण धवनसोबत सुई-धागाचे शूटिंग  देखील सुरु केली आहे. सुई धागामध्ये ती लेडीज टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. यश राज बॅनरखाली तयार होणार हा चित्रपट गांधी जयंतीच्या आधी चित्रपटातगृहात प्रदर्शित होणार आहे. 

ALSO READ :  ​अनुष्का शर्माच्या ‘परी’चे नवे पोस्टर बघून तुमचा होईल थरकाप!

Web Title: Anushka Sharma and Virat Kohli did not have the time to get married, Karan Johar's offer was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.