अंकुशचे फेक टष्ट्वीटर अकाऊंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 04:16 IST2016-03-12T11:08:32+5:302016-03-12T04:16:44+5:30

          अंकुश चौधरीली तुम्ही टष्ट्वीटरवर फॉलो करताय.... मग जरा सांभाळूनच करा.  सेलिब्रिटीजच्या नावाने सोशल मिडियावर ...

Ankushche Fake Tweeter Account | अंकुशचे फेक टष्ट्वीटर अकाऊंट

अंकुशचे फेक टष्ट्वीटर अकाऊंट


/>          अंकुश चौधरीली तुम्ही टष्ट्वीटरवर फॉलो करताय.... मग जरा सांभाळूनच करा.  सेलिब्रिटीजच्या नावाने सोशल मिडियावर फेक अकाऊंट्स सुरु करुन त्याच्यावर बºयाच गोष्टी अपलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा फेक पेजेसला व्हेरीफाय न करता अनेक फॅन्स आपल्या हिरोंचे प्रोफाइल लाईक करतात अन अगदी आंधळेपणाने अशा फेक अकाऊंट्सला फॉलो करतात. आता अंकुश चौधरीचे सुद्धा टष्ट्वीटरवर फेक अकाऊंट करण्यात आले आहे. अंकुश आर्मी या नावाने ते अकाऊंट असुन त्यावर अंकुश चौधरीशी निगडीत अनेक न्युज, फोटोज, लेटेस्ट अपडेट दिले जातात. एवढेच नाही तर अंकुश आता नव्या चित्रपटात सई ताम्हणकर सोबत झळकणार आहे, त्या चित्रपटाचे नाव ब्रदर असुन चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव करणार असल्याचे त्यात मेन्शन केले आहे. तसेच स्वप्निल जोशी देखील यांच्यासोबत असल्याचे टष्ट्वीट नूकतेच या अकाऊंट वरुन करण्यात आले होते. यासंदर्भात सीएनएक्सने संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता संजय म्हणाला, मी असा कोणताही चित्रपट करीत नाही. अंकुश आर्मी नावाचे ते अकाऊंट फेक आहे. त्यामुळे अंकुशच्या चाहत्यांनी या फेक अकाऊंट पासुन जरा सावधच रहावे. 
 

Web Title: Ankushche Fake Tweeter Account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.