'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा'च्या मंचावर अंकुश चौधरी झाला भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 08:09 PM2023-04-11T20:09:20+5:302023-04-11T20:09:58+5:30

Ankush Chaudhary : खानदेशच्या प्रथम बोरसे याने नृत्यातून साकारलेला आपला जीवनपट पाहून अंकुश चौधरी भावुक झाला.

Ankush Choudhary got emotional on the stage of 'I will be a Superstar Jallosh Juniorscha' | 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा'च्या मंचावर अंकुश चौधरी झाला भावुक

'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा'च्या मंचावर अंकुश चौधरी झाला भावुक

googlenewsNext

अंकुश चौधरी... मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार. चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुश यांनी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता सुपरस्टार झाला. अंकुश यांचा सुपरस्टार पदापर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या बच्चेकंपनीने आपल्या नृत्यातून सादर केला. खानदेशच्या प्रथम बोरसे याने नृत्यातून साकारलेला आपला जीवनपट पाहून अंकुश चौधरी भावुक झाला. 

प्रथमने सादर केलेल्या परफॉर्मन्सच्या निमित्ताने अंकुश यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा खास परफॉर्मन्स या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळतेय. 

बच्चेकंपनीचे दमदार परफॉर्मन्सेस, फुलवा खामकर आणि वैभव घुगे यांचं मार्गदर्शन आणि  सुपरजज अंकुश चौधरीचा सळसळता उत्साह यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या दोस्तांचे असेच नवनवे परफॉर्मन्स पहाण्यासाठी न चुकता पाहा मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: Ankush Choudhary got emotional on the stage of 'I will be a Superstar Jallosh Juniorscha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.