'अंगुरी भाभी' शुभांगी अत्रे करणार राजकारणात प्रवेश? मालिका सोडणार असल्याच्या चर्चांवर दिले असे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 10:44 IST2017-11-29T05:14:16+5:302017-11-29T10:44:16+5:30

सध्या शिल्पा शिंदे नंतर दुसरी अंगुरी भाभी बनलेली अभिनेत्री शुभांगी अत्रेही 'भाभीजी घर पर है' ही लोकप्रिय मालिका सोडणार ...

'Anguri Bhabhi' Shubhangi Atre enters politics? The answer given to the churches to leave the series | 'अंगुरी भाभी' शुभांगी अत्रे करणार राजकारणात प्रवेश? मालिका सोडणार असल्याच्या चर्चांवर दिले असे उत्तर

'अंगुरी भाभी' शुभांगी अत्रे करणार राजकारणात प्रवेश? मालिका सोडणार असल्याच्या चर्चांवर दिले असे उत्तर

्या शिल्पा शिंदे नंतर दुसरी अंगुरी भाभी बनलेली अभिनेत्री शुभांगी अत्रेही 'भाभीजी घर पर है' ही लोकप्रिय मालिका सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. सेलिब्रिटीचं निवडणूकीच्या मैदानात उतरणं... यांत आणखी एक मराठमोळं नाव जोडलं जाणार आहे. अभिनेत्री शुभांगी अत्रे राजकारणात प्रवेश करण्याची तयारी करत असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत.यावर शुभांगी राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा ख-या आहेत.मात्र ख-याखु-या आयुष्यात कोणती निवडणुक लढवणार नसून मालिकेत निवडणुक लवढवताना शुभांगी दिसणार आहे.त्यामुळे मालिकेची टीम नवीन अंगुरी भाभीच्या शोधात असल्याचे निव्वळ अफवा असल्याचे तिने म्हटले आहे.

 शिल्पा शिंदेने जेव्हा ही मालिका सोडली तेव्हा नवीन अंगुरी भाभी शोधणे मालिकेच्या टीमसाठी मोठं आव्हान होतं. त्याचवेळी शुभांगी अत्रेची 'अंगुरी भाभी' या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. आणि शुभांगीने देखील अवघ्या काही दिवसांतच रसिकांची पसंती मिळवली.त्यामुळे शिल्पा शिंदेची जागा शुभांगी अत्रेने भरून काढली होती. मालिकेचा टीआरपीही वधारला होता. शुभांगी राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा खरी असली तरीही शुभांगी अत्रे ऑनस्क्रीन निवडणुक लढवताना दिसणार आहे.मालिकेत निवडणुकांची धामधुम पाहायला मिळणार आहे. यांत अंगुरी भाभी(शुभांगी अत्रे) आणि अनिता भाभी(सौम्या टंडन) या राजकारणात एंट्री करणार असल्याचा ट्रॅक रसिकांना पाहायला मिळणार आहे. अंगुरी भाभी 'भोली भाली पार्टी' तर अनिता भाभी 'तेज तर्रार पार्टी'च्या माध्यमातून निवडणुका लढवताना दिसणार आहेत.राजकारण आणि निवडणुका, उमेदवारी..हा  या मालिकेचा नविन ट्रॅक असणार आहे.त्यामुळे शुभांगीही मालिका सोडून जात असल्याने निर्माते नवीन चेहरा शोधण्याच्या तयारीत असल्याच्या या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.तुर्तास मालिकेत अंगुरी भाभी आणि अनिता भाभी कोण विजयी ठरणार हे पाहणे रसिकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

Also Read:सौम्या टंडन म्हणतेय मी भाभीजी घर पर है मालिका सोडलेली नाहीये

'अंगुरी भाभी' या व्यक्तिरेखेमुळे शुभांगीची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे.अनेक राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या ऑफर्स येत आहेत. याविषयी शुभांगी सांगते, "मला प्रचार करण्यासाठी सध्या अनेक राजकीय पक्षांकडून विचारले जात आहे. पण मी अद्याप कोणाचा प्रचार करायचा की नाही याबाबत विचार केलेला नाही. जर प्रचार करायचा असे मी ठरवले तर मी सर्वात आधी सगळ्या राजकीय पक्षांचा अभ्यास करेन, मला जे योग्य वाटतील त्यांचाच मी प्रचार करेन. तसेच कोणत्याही एका व्यक्तीचा अथवा पक्षाचा प्रचार करण्यापेक्षा लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायला मला अधिक आवडेल.आपल्या देशात मतदानाचा आकडा खूपच कमी आहे.लोक मतदानाच्या दिवशी सुट्ट्या काढून फिरायला जातात. त्यामुळे मला मतदानाविषयी जनजागृती करायला आवडेल. 

Web Title: 'Anguri Bhabhi' Shubhangi Atre enters politics? The answer given to the churches to leave the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.