अंगुरी भाभीने लग्नाच्या शूटिंगसाठी घातला स्वतःच्या लग्नातला लेहंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 17:54 IST2016-11-07T17:43:47+5:302016-11-07T17:54:55+5:30

'भाभीजी घर पर है' या मालिकेत विभूतीजीसह अंगुरी भाभीचे लग्न लागल्याचे पाहायला मिळाले. हे सारे नाट्य घडले ते अंगुरी ...

Angun bhabi will take her wedding to shoot for marriage | अंगुरी भाभीने लग्नाच्या शूटिंगसाठी घातला स्वतःच्या लग्नातला लेहंगा

अंगुरी भाभीने लग्नाच्या शूटिंगसाठी घातला स्वतःच्या लग्नातला लेहंगा

'
;भाभीजी घर पर है' या मालिकेत विभूतीजीसह अंगुरी भाभीचे लग्न लागल्याचे पाहायला मिळाले. हे सारे नाट्य घडले ते अंगुरी भाभीच्या आजीमुळे. बराच काळात कोमात राहिल्यानंतर अंगुरीची आजी शुद्धीवर येऊ लागते. आपण सांगितलेल्या मुलाशीच अंगुरीने लग्न करावे अशी तिच्या आजीची इच्छा असते.त्यानंतर लग्नाची मागणी घालण्यासाठी विभूती तिवारीसह आजीकडे येतात. मात्र त्यावेळी आजी तिवारीऐवजी अंगुरीचा नवरदेव म्हणून विभूतींजीची निवड करते. आजीचा निर्णय ऐकून सा-यांनाचा आश्चर्याचा धक्का बसतो. मात्र आजीला खुश करण्यासाठी आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी अंगुरी विभूतींजीसह लग्न करते. या सीनच्या शूटिंगसाठी अंगुरी भाभी साकारत असलेली शुभांगी अत्रेने वधुच्या गेटअपसाठी चक्क तिचा स्वतःच्या लग्नातला लेहंगा तिने यावेळी घातला होता.शुभांगीला तिच्या भूमिकेसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट असावी असा आग्रह असतो. म्हणूनच कसलाही विचार न करता तिच्या लग्नाचा लेहंगा वापरणे पसंत केले.याविषयी शुभांगी सांगते प्रत्येक मुलीला आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. त्यासाठी इतर मुलींप्रमाणे ख-या आयुष्यात माझा लग्नाचा लेहंगा मी खूप आवडीने खरेदी केला. त्यानंतर तो लेहंगा घालण्याची संधी मला मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा मला तो लेहंगा घालता यावा अशा संधीची खरं तर मी वाट पाहात होते. सुदैवाने शूटिंगच्या निमित्ताने का होईना मला तो माझा फेव्हरेट लेहंगा घालण्याची संधी मिळाली. लग्नाचा सिक्वेंस शूट करत असताना माझ्या ख-या आयुष्यातील लग्नाच्या काही आठवणी ताज्या झाल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे चॅनलनेही शुभांगीला तिचा स्वतःचा लेहंगा वापरण्यासाठी परवानगी दिल्यामुळे चॅनलचेही तिने आभार मानले आहेत. कारण चॅनल कलाकारांच्या कपड्यापासून ते गेटअपपर्यंत काय घालणार हे सगळ्या गोष्टी ठरवते त्यात कोणाच्याही आवडीनिवडीचा चॅनल विचार करत नाही. मात्र यावेळी चॅनलही शुभांगीच्या भावना समजून घेतल्याचे पाहायला मिळाले. 

Web Title: Angun bhabi will take her wedding to shoot for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.