'सारं काही तिच्यासाठी'मधील मंजू आणि बंधूवर 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; रिल चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 05:57 PM2024-06-12T17:57:52+5:302024-06-12T17:58:19+5:30

Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील मंजू आणि बंधू यांनी 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा...' या गाण्यावर रिल बनवला आहे. या गाण्यासोबत 'एक लाजरान् साजरा मुखडा'चे रिमिक्स करण्यात आले आहे. त्यांच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

'Angaro Sa' song fever on Manju and Bandhu from 'Sara Kahi Tichyasathi'; Reel in discussion | 'सारं काही तिच्यासाठी'मधील मंजू आणि बंधूवर 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; रिल चर्चेत

'सारं काही तिच्यासाठी'मधील मंजू आणि बंधूवर 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; रिल चर्चेत

साऊथचा स्टायलिश स्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या त्याच्या आगामी 'पुष्पा २ - द रुल' (Pushpa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) अभिनीत या चित्रपटातील दुसरे गाणे 'अंगारो सा' (Anagaro Sa) रिलीज झाले आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या गाण्याची लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भुरळ पडली असून एकापेक्षा एक हटके रिल पाहायला मिळत आहेत. दरम्यान झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी मालिकेतील मंजू आणि बंधू यांच्यावर देखील या गाण्याचा फिव्हर पाहायला मिळाला. त्यांनीदेखील या गाण्यावर रिल बनवला आहे.

झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील कौटुंबिक कथेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. दरम्यान खोत कुटुंबातील बंधू आणि त्याची पत्नी मंजू चर्चेत आली आहे. खरेतर बंधूची भूमिका साकारणारा अभिनेता शशिकांत केरकर आणि मंजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैशाली भोसले हिने पुष्पा २मधील अंगारो सा या गाण्यावर रिल बनवला आहे. या गाण्यासोबत एक लाजरान् साजरा मुखडाचे रिमिक्स करण्यात आले आहे. त्यांच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
मंजू आणि बंधूच्या रिलवर या मालिकेतील निशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दक्षता जोईल हिनेदेखील कमेंट केली आहे. तिने लिहिले की, माझी रश्मिका वैशाली भोसले आणि अल्लू शशिकांत केरकर. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटले की, सुपरहिट जोडी. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, वॉव एक नंबर ताई. तर काहींनी लय भारी, क्या बात अशा कमेंट केल्या आहेत. 

Web Title: 'Angaro Sa' song fever on Manju and Bandhu from 'Sara Kahi Tichyasathi'; Reel in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.