​.... आणि यामुळे अमृता डिप्रेशनमध्ये गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 10:18 IST2016-11-01T10:18:55+5:302016-11-01T10:18:55+5:30

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना आपल्या कामामुळे, नातेसंबंधात अालेल्या दुराव्यामुळे डिप्रेशनचा सामना करावा लागतो. अभिनत्री अमृता पुरीदेखील काही दिवस डिप्रेशनमध्ये ...

.... and that's why Amrita went to the depression | ​.... आणि यामुळे अमृता डिप्रेशनमध्ये गेली

​.... आणि यामुळे अमृता डिप्रेशनमध्ये गेली

्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना आपल्या कामामुळे, नातेसंबंधात अालेल्या दुराव्यामुळे डिप्रेशनचा सामना करावा लागतो. अभिनत्री अमृता पुरीदेखील काही दिवस डिप्रेशनमध्ये होती असा खुलासा तिने स्वतः केला आहे. 
अमृता तिच्या वैयक्तिक कारणांमुळे डिप्रेशनमध्ये गेली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर ते अतिशय चुकीचे आहे. अमृता तिच्या कोणत्याही वैयक्तिक कारणांमुळे नव्हे तर तिच्या पी.ए.डब्ल्यू बंदी युद्ध के या मालिकेमुळे डिप्रेशनमध्ये गेली होती. या मालिकेची कथा ही इतर सासू-सूनेंच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी आहे. कारगिलच्या युद्धात शत्रूच्या हाती लागलेल्या दोन सैनिकांची ही कथा आहे. हे सैनिक युद्धानंतर 17 वर्षांनंतर आपल्या घरी परततात. या मालिकेत अमृता पुरी, संध्या मृदूल, पुरब कोहली आणि सत्यदीप मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत अमृता हरलिन ही भूमिका साकारत असून तिच्या लग्नानंतर लगेचच तिचा पती युद्धाच्या दरम्यान शत्रूच्या हाती सापडतो. पतीनंतर ती आपल्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी एकटी कशाप्रकारे पेलते हे या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हरलीन आपली दुःखं कोणालाही दाखवू न देता गेली 17 वर्षं नवऱ्याची वाट पाहात आहे. या भूमिकेविषयी अमृता सांगते, "ही भूमिका खूप आव्हानात्मक आहे. या मालिकेचे चित्रीकरण करायला सुरुवात केल्यानंतर एक वेगळाच अनुभव मी घेत आहे. या मालिकेतील काही भावनिक दृश्यांचे चित्रीकरण केल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेली होती. मी जवळजवळ एक आठवडा तरी डिप्रेशनमध्ये होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला काही दिवसांचा ब्रेक घ्यावा लागला." 

Web Title: .... and that's why Amrita went to the depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.