... आणि दिव्यांका भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 13:42 IST2016-09-12T08:12:31+5:302016-09-12T13:42:31+5:30

ये है मोहोब्बते या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी नुकतेच लग्न केले. दिव्यांका गेली अनेक ...

... and the light of the lamp shook | ... आणि दिव्यांका भडकली

... आणि दिव्यांका भडकली

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">ये है मोहोब्बते या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी नुकतेच लग्न केले. दिव्यांका गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. आज छोट्या पडद्यावरची एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. या लोकप्रियतेमुळे तिच्याकडे अनेक जाहिरातींच्या ऑफर्स आहेत. नुकत्याच आलेल्या एका बातमीमुळे दिव्यांका प्रचंड भडकली आहे. एका वेबसाईटने त्यांच्या बातमीत म्हटले आहे की, दिव्यांकाला मिळणाऱ्या जाहिरातींमध्ये विवेकलाही घेतले जावे अशी मागणी ती सतत करत आहे. पण या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे दिव्यांकाचे म्हणणे आहे. अशाप्रकारच्या चुकीच्या बातम्या कोण पसरवत आहे हेच मला कळत नाही असे दिव्यांका सांगते. 

Web Title: ... and the light of the lamp shook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.