'आणि मी तिथेच आहे'...', 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:58 AM2022-09-15T11:58:50+5:302022-09-15T11:59:33+5:30

Milind Gawali: अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळी बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असतो.

'And I am there'...', Anirudh aka Milind Gawli's post of 'Ai Khe Kya Karte' fame is in discussion | 'आणि मी तिथेच आहे'...', 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीची पोस्ट चर्चेत

'आणि मी तिथेच आहे'...', 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी (Milind gawali). चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून मिलिंद गवळीनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. सध्या तो 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्ध ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. अनिरुद्ध ही भूमिका निगेटिव्ह असली तरी प्रेक्षकांनी त्यांना भरभरुन प्रेम दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील पोस्टला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसतो. दरम्यान आता नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर मालिकेचा व्हिडीओ शेअर करत कांचन आईसाठी स्पेशल पोस्ट लिहिली होती. मात्र त्याने ती पोस्ट डिलिट केली आहे. यामागचं कारण समजू शकले नाही.

अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीने इंस्टाग्रामवर आई कुठे काय करतेचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, असहाय्य अनिरुद्धसाठी आईचं प्रेम. एकेकाळी कर्तृत्ववान अनिरुद्ध आता फारच असह्य झाला आहे, त्याची व्यथा तो सतत मांडत असतो, अरूंधतीला यश मिळाला आहे , ती खूप पुढे निघून गेलेली आहे , म्हणून त्याला त्रास होतो , असं जे सगळ्यांना वाटतं तसं नाही आहे, अमिताभ बच्चन जया भादुरी चा "अभिमान " सिनेमासारखं नाही आहे असं तो म्हणतोय, हे सगळं तो जीव तोडून सांगायचा प्रयत्न करतो आहे, त्याची आई सोडल्यास , म्हणजेच कांचन आई सोडल्यास , दुसरा कोणाचाही त्याच्यावर आता भरोसा , विश्वास राहिलेला नाहीये, शेवटी कांचन आई ती बिचारी आई आहे, तीच आपल्या मुलाला आधार देणार, आई मुलांवर निस्वार्थ प्रेम करत असते , मग ती अनिरुद्धची आई असली तरी शेवटी ती आईच आहे.


मिलिंद गवळीने या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, अर्चनाताई पाटकर यांनी हा सीन खूप छान केला, भावनिक सीन्स त्या खरच खूपच छान करतात, सीन सुरू व्हायच्या आधी त्या मिश्किलपणे हसत असतात, पण एकदा का सीन सुरू झाला, की चटकन त्यांच्या डोळ्यात पाणी येत, त्यांचे डोळे भरून येतात, आवाजात एक वेगळाच कंप निर्माण होतो, समोरच्याच्या काळजाला जाऊन तो असा भिडतो की समोरच्या कलाकारांचे ही डोळे भरून येतात, या सीनमध्ये त्यांच्याकडे पाहिलं आणि माझेही डोळे भरून आले. लव्ह यू अर्चू ताई. आमचा घटस्फोट झाल्यावर अरुंधती खूप पुढे निघून गेली आणि मी तिथेच आहे'...'आई कुठे काय करते !' सोम-शनि संध्या. ७:३० वा. Star प्रवाहवर. 

Web Title: 'And I am there'...', Anirudh aka Milind Gawli's post of 'Ai Khe Kya Karte' fame is in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.