'सावळ्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, भैरवीनं ठरवलं ताराचं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:48 IST2025-05-07T16:48:10+5:302025-05-07T16:48:31+5:30
Savalayachi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत गाण्याच्या स्पर्धेत असे काही घडणार आहे ज्यामुळे भैरवीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, भैरवीनं ठरवलं ताराचं लग्न
'सावळ्याची जणू सावली' मालिकेत (Savalayachi Janu Savali Serial) गाण्याच्या स्पर्धेत असे काही घडणार आहे ज्यामुळे भैरवीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. त्या स्पर्धेत जग्गनाथ परीक्षकांपैकी एक आहे. स्पर्धेदरम्यान एक नवीन पुरुष गायक पिंकू म्हात्रेची एंट्री होते, ज्याला ताराच गुपित माहिती आहे. सारंग आणि तिलोत्तमा यांची कंपनी अपघाताने स्पर्धेच्या अंतिम फेरीचे प्रायोजक आहेत. या टप्प्यावर सावलीचा संघर्ष अधिक तीव्र होतो. तर दुसरीकडे अस्मीला वाटत की सावली वेळेत पोहोचणार नाही.
अंतिम फेरीच्या दिवशी तीन मोठे नाट्यमय प्रसंग घडणार आहेत. अस्मी सावलीला स्पर्धेत जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते ज्याने भैरवीची चिंता वाढते. तर जग्गनाथ सावलीला एक द्रवपदार्थ पाजतो ज्यामुळे तात्पुरता तिचा आवाज जातो आणि तारा स्पर्धा हरते. ही स्पर्धा नवीन आलेला मुलगा पिंकू म्हात्रे जिंकतो. स्पर्धा जिंकल्यानंतर तो मुलगा भैरवीला ब्लॅकमेल करून ताराशी लग्न करण्याची मागणी करतो. हे ऐकून भैरवीच्या पाया खालची जमीन सरकणार आहे.
भैरवी घेते ताराकडून वचन
भैरवी टेंशनमध्ये ताराला सत्य सांगते. हे सर्व ताराला सहन होत नाही आणि ती भैरवीला शब्द देते की मी तुला कधीच हार मानू देणार नाही. भैरवी त्याच क्षणी ताराकडून वचन घेते की तू माझा शब्द कधीच मोडणार नाही आणि तेव्हा ती खुलासा करणार आहे की, तुझं लग्न पिंकू म्हात्रे सोबत ठरवले आहे. आता काय असेल ताराची भावना? भैरवीचा शब्द कसा पाळेल तारा? पिंकू म्हात्रेच्या अटींनी सावलीच्या आयुष्यावर काय परिणाम होईल? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.