मला जाऊद्या ना घरी आता वाजले कि बारा या गाण्यावर लावणी करुन तमाम पे्रक्षकांना ...
अमृताचा सुपर क्लिक
/> मला जाऊद्या ना घरी आता वाजले कि बारा या गाण्यावर लावणी करुन तमाम पे्रक्षकांना घायाळ करणारी अमृता खानविलकर सध्या हॅपी मुडमध्ये पहायला मिळत आहे. मॉडर्न लुक मध्ये ती आता प्रेक्षकांच्या समोर येत असुन सध्या बसस्टॉप या चित्रपटाच्या चित्रीकरणात ती व्यस्त आहे. एवढेच नाही तर सध्या अमृता पुरस्कार सोहळे, कार्यक्रम पार्टीजमध्ये तिच्या याच लुकमध्ये पहायला मिळत आहे. नूकतेच ती एका कार्यक्रमात पिंक कलरच्या पंजाबी ड्रेस मध्ये पहायला मिळाली. यावेळी तिच्यासोबत अभिनेते मकरंद देशपांडे अन दिग्दर्शक रवी जाधव हे देखील होते. या तिघांनी मिळून मस्त सेल्फी देखील काढला. आता आपल्याला सेल्फीमध्ये तर हे तिघे एकत्र पहायला मिळाले परंतू लवकरच कोणत्या चित्रपटात या तिघांचे दर्शन आपल्याला होईल का अशी आशा करायला काहीच हरकत नाही. पण ते काहीही असो या तिघांचा हा सेल्फी मात्र झक्कास याला हेच खरे.