अमृताने दिली खास भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 15:38 IST2016-06-04T10:08:29+5:302016-06-04T15:38:29+5:30
अमृता राव सध्या मेरी आवाजही पहचान है या मालिकेत कल्याणी गायकवाड ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या टीमला अमृताने ...
.jpg)
अमृताने दिली खास भेट
अ ृता राव सध्या मेरी आवाजही पहचान है या मालिकेत कल्याणी गायकवाड ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या टीमला अमृताने नुकतेच मोटोराईझट फॅन गिफ्ट म्हणून दिले आहेत. अमृताने टीमला फॅन गिफ्ट देण्यामागचे एक कारण आहे. अनेकवेळा मालिकेचे आऊटडोर चित्रीकरण असते. आऊटडोरला चित्रीकरण करत असताना सगळ्यांनाच प्रचंड उकडतं. चित्रीकरण करत असताना टीममधील क्रू मेंबर कलाकारांची काळजी घेत असतात. चित्रीकरणाच्यावेळी कलाकारांना सगऴ्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांचीही काळजी घेणे गरजेचे आहे असे वाटत असल्याने अमृताने त्यांना फॅन दिले आहेत. तसेच फॅन मोटोराईझट असल्याने टीममधी लोक पाहिजे तिथे त्या फॅनचा वापर करू शकतात असे तिचे म्हणणे आहे.