अमिताभ बच्चन यांना घरातील 'या' सदस्यासोबत खेळायचंय केबीसी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 04:00 PM2018-08-28T16:00:00+5:302018-08-28T16:12:33+5:30

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा 10 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन असून या नव्या सिझन साठी ते खूपच उत्सुक आहेत.

Amitabh bacchan wants to play kbc with this family member | अमिताभ बच्चन यांना घरातील 'या' सदस्यासोबत खेळायचंय केबीसी

अमिताभ बच्चन यांना घरातील 'या' सदस्यासोबत खेळायचंय केबीसी

ठळक मुद्देकौन बनेगा करोडपतीच्या माध्यामाने साऱ्यांचे तुफान मनोरंजन केले आहेलवकरच या कार्यक्रमाचा 10 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा 10 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन असून या नव्या सिझन साठी ते खूपच उत्सुक आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारसोबत गप्पा मारल्या. त्यावेळी तुमची नात आराध्या सोबत तुम्ही कौन बनेगा करोडपती हा खेळ खेळता का असे विचारले असता त्यांनी हसत उत्तर दिले की मी अद्याप कधी तिच्यासोबत कौन बनेगा करोडपती खेळलेलो नाहीये. पण ही चांगली कल्पना आहे. मला तिच्या सोबत खेळायला नक्कीच आवडेल. आता घरी गेल्यावर मी तिच्या सोबत नक्किच खेळेन. आमच्या घरात सगळ्यात खराब जनरल नॉलेज माझे आहे असे देखील ते यावेळी सांगायला विसरले नाही. 

अमिताभ बच्चन यांनी रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीच्या माध्यामाने साऱ्यांचे तुफान मनोरंजन केले आहे. कौन बनेगा करोडपती या शोमधून अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना करोडपती बनवले. केबीसीच्या याच प्रश्नाच्या रंगमंचावर छोट्या छोट्या गावातल्या स्पर्धकांची मोठी स्वप्न साकार होतात. देवीयों और सज्जनो! हे बिग बी अमिताभ बच्चन यांचे हे शब्द पुन्हा एकदा घराघरात घुमणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला होता. आता पुन्हा तीच जादू छोट्या पडद्यावर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे आजवरचे सगळे सिझन गाजले आहेत. त्यामुळे दहावा सिझन देखील प्रेक्षकांना तितकाच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. 

Web Title: Amitabh bacchan wants to play kbc with this family member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.