​अली असगरने सांगितले द कपिल शर्मा शो सोडण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 12:26 IST2017-06-16T06:56:52+5:302017-06-16T12:26:52+5:30

द कपिल शर्मा शोमधील अली असगर साकारत असलेली नानी ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. या कार्यक्रमात गेली अनेक वर्षं ...

Ali Asghar said the reasons for leaving the show are "Kapil Sharma" | ​अली असगरने सांगितले द कपिल शर्मा शो सोडण्याचे कारण

​अली असगरने सांगितले द कपिल शर्मा शो सोडण्याचे कारण

कपिल शर्मा शोमधील अली असगर साकारत असलेली नानी ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. या कार्यक्रमात गेली अनेक वर्षं त्याला आपल्याला पाहायला मिळाले होते. पण काही महिन्यांपूर्वी त्याने या कार्यक्रमाला रामराम ठोकला. कपिल शर्मा आणि त्याची टीम सिडनीला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली होती. तिथून परतत असताना कपिल शर्मा खूपच दारू प्यायलेला होता. त्या अवस्थेत त्याने सुनील ग्रोव्हरला शिवीगाळ केली आणि त्यामुळे अली असगर, सुनील ग्रोव्हर आणि चंदन प्रभाकर यांनी हा कार्यक्रम सोडला असे म्हटले जात होते. पण अलीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम का सोडला याचा खुलासा केला आहे. तो सांगतो, माझ्या आणि कार्यक्रमाच्या टीममध्ये माझ्या व्यक्तिरेखेवरून काही मतभेद झाले असल्याने मी हा कार्यक्रम सोडण्याचे ठरवले. व्यक्तिरेखेला कार्यक्रमात करण्यासारखे काही उरलेच नव्हते आणि त्यामुळे मी या मालिकेला निरोप देण्याचे ठरवले.
अली असगर द कपिल शर्मा शोमध्ये एका स्त्रीच्या व्यक्तिरेखेत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याने याआधीदेखील कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात स्त्री व्यक्तिरेखा साकारली होती. प्रेक्षकांना त्याच्या या दोन्ही भूमिका खूप आवडल्या होत्या. पण पुढील काळात स्त्री व्यक्तिरेखा साकारायची नाही असे त्याने ठरवले आहे. तो सांगतो, द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट विथ कपिल, कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात मी स्त्री व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. पण आता काहीतरी वेगळे करण्याचे मी ठरवले आहे. 

Web Title: Ali Asghar said the reasons for leaving the show are "Kapil Sharma"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.