'गाडी घुंगराची येईल न्यायला...' बाप्पाच्या स्वागतासाठी अक्षया देवधरचा खास लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 16:41 IST2023-09-15T16:40:32+5:302023-09-15T16:41:41+5:30
आपल्या पाठकबाई अर्थात अक्षया देवधर हिनं बाप्पासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला.

Akshaya Deodhar
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... अशा जयघोषात सध्या गणरायाच्या आगमणाचे वेध लागले आहेत. अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव राहिला असल्यानं तयारींना वेग आलाय. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजन गणरायाच्या आगमणाच्या गडबडीत व्यस्त आहेत. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाप्पाचे आगमन म्हटल्यावर सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे.
अनेक मराठी सेलिब्रिटींच्याही घरी गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. मराठी अभिनेत्रींनी खास मराठमोळ्या साजात बाप्पासोबत खास फोटोशूट केलं आहे. आपल्या पाठकबाई अर्थात अक्षया देवधर हिनं बाप्पासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. 'गाडी घुंगराची येईल न्यायला गाडी घुंगराची येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला', हे गाणे तिने व्हिडीओला जोडले आहे. यात अक्षयाने इरकल साडी आणि दागिण्यांच्या शृंगार केलाय. यात ती कमालीची सुंदर दिसतीय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अक्षया घराघरात पोहचली. अक्षया देवधर हिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली होती. परंतु, तिला खरी ओळख 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून मिळाली. अक्षया आपल्या क्लासी लूक आणि ग्लमरस अदामुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते.