​पिया अलबेलामधील अक्षय म्हात्रेने शीन दासला शिकवली बंदूक चालवायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 16:39 IST2017-11-21T11:09:33+5:302017-11-21T16:39:33+5:30

झी टिव्हीच्या पिया अलबेला मधील पूजा म्हणजेच शीन दास आणि नरेन म्हणजेच अक्षय म्हात्रे हे प्रेक्षकांना खूप आवडतात. या ...

Akshay Mhatre of Piya Abel, taught Sheen Das and started a gun | ​पिया अलबेलामधील अक्षय म्हात्रेने शीन दासला शिकवली बंदूक चालवायला

​पिया अलबेलामधील अक्षय म्हात्रेने शीन दासला शिकवली बंदूक चालवायला

टिव्हीच्या पिया अलबेला मधील पूजा म्हणजेच शीन दास आणि नरेन म्हणजेच अक्षय म्हात्रे हे प्रेक्षकांना खूप आवडतात. या दोघांमधील केमिस्ट्री तर मालिकेत खूपच छान जमून आली आहे. नुकताच पूजा आणि कपूर म्हणजेच खालिद सिद्दीकी यांच्यात एक खूप इंटरेस्टिंग दृश्य चित्रीत करण्यात आले. त्या दोघांनी एकमेकांवर बंदूक रोखली आणि त्यातून गोळी सुटली असे हे दृश्य होते. राहुल म्हणजेच अंकित व्यास आणि कपूर यांचे सत्य आता उघड होणार आहे आणि नरेनला कळणार आहे की, पूजाचे म्हणणे योग्य होते आणि त्यानंतर तो तिच्याशी लग्न करण्यासाठी तयार होणार आहे. नरेन आणि पूजा हे अखेरीस एकत्र आले आहेत हे कळल्यानंतर कपूर संतापणार आहे आणि त्यामुळे तो नरेनवर बंदूक रोखणार आहे. नरेनचे संरक्षण करण्यासाठी पूजा त्या दोघांमध्ये येणार असून कपूर यांच्यावर ती बंदूक रोखणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथेला चांगलीच कलाटणी मिळणार आहे.
शीन दाससाठी या दृश्याचे चित्रीकरण करणे हे सोपे नव्हते. तिला बंदूकीची खूप भीती वाटते. त्यामुळे या दृश्याचे चित्रीकरण करताना तिला चांगलेच टेन्शन आले होते. या सिक्वेन्स विषयी बोलताना शीन सांगते, “बंदूक हातात धरणे हे अतिशय भीतीदायक होते आणि बंदूकीतून गोळी झाडल्यावर माझी भीती अजूनच वाढली होती. या दृश्यात अक्षयची मला खूपच मदत झाली, त्याने मला या सिक्वेन्ससाठी बंदूक कशी चालवायची ते शिकवले. काही वेळानंतर मला बंदूकीची सवय झाली आणि मला मी डेअरडेव्हील असल्यासारखे वाटू लागले. मला असे वाटत होते की, मी रोहित शेट्टीच्या एखाद्या सिनेमात काम करत आहे, जेव्हा तो शॉट संपला तेव्हा मी प्रचंड आनंदित झाली होती.” 
अक्षयने शीनसोबतचा या दृश्यातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून “बंदूक से नही ...पर गोलियों से तो डर जरूर लगता है।” असे लिहिले आहे. त्याच्या या पोस्टला नेटिझन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Also Read : ​मैंने प्यार किया या चिपटातील हा सीन प्रेक्षकांना पाहायला मिळणार पिया अलबेला या मालिकेत

Web Title: Akshay Mhatre of Piya Abel, taught Sheen Das and started a gun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.