अक्षर कोठारीची नवी मालिका, दिसणार नव्या ढंगात, नव्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 11:15 AM2023-10-27T11:15:11+5:302023-10-27T11:41:46+5:30

आता अक्षयची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akshar Kothari's will seen in new marathi serial laxmichya Paulanni | अक्षर कोठारीची नवी मालिका, दिसणार नव्या ढंगात, नव्या अंदाजात

अक्षर कोठारीची नवी मालिका, दिसणार नव्या ढंगात, नव्या अंदाजात

मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता अक्षर कोठारी(Akshar Kothari)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. बंध रेशमाचे या मालिकेतून अक्षरने मराठी मालिका क्षेत्रात पाऊल टाकले होते. आराधना, छोटी मालकीण, चाहूल २ अशा मालिकेत तो पाहायला मिळाला. अक्षरने स्वाभिमान मालिकेत शंतनू सूर्यवंशी भूमिका साकारत होती. छोट्या पडद्यावरील त्याची ही मालिका लोकप्रिय झाली होती. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

आता अक्षयची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत अक्षय  अद्वैत चांदेकर ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल.अद्वैत बिझनेस मॅन आहे. वडिलोपार्जित चालत आलेला सोनं, चांदी आणि हिऱ्यांचा बिजनेस तो एकटा सांभाळतो. बिझनेसशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट तो खूप प्रामाणिकपणे करतो. तो जे पारखून घेईल त्यात चूक शोधूनही सापडणार नाही.  २० नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु होणार आहे. 

 

अद्वैत चांदेकर या व्यक्तिरेखेविषयी सांगताना अक्षर म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत माझं जुनं नातं आहे. प्रवाह कुटुंबाचा भाग असल्याचा आनंद आहे. दिवाळीच्या धामधुमीत माझी लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवी मालिका भेटीला येतेय. स्वाभिमान संपल्यानंतर नवीन काय अशी सातत्याने विचारणा होत होती. लक्ष्मीच्या पाऊलांनीच्या निमित्ताने नवं पात्र साकारायला मिळत आहे. इशा केसकरसोबत पहिल्यांदाच काम करतोय. भेटताक्षणीच आमची छान मैत्री झाली. याआधीच्या मालिकांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. हेच प्रेम नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे अशी भावना अक्षर कोठारीने व्यक्त केली.

Web Title: Akshar Kothari's will seen in new marathi serial laxmichya Paulanni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.