५५० जणांच्या ऑडिशन्समधून विठूमाऊलीची भूमिका साकारण्यासाठी अजिंक्य राऊतची झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 10:25 IST2017-11-11T04:55:51+5:302017-11-11T10:25:51+5:30

स्टार प्रवाहची पौराणिक नवी मालिका 'विठूमाऊली'ने अल्पावधीतच महाराष्ट्रावर गारूड केले आहे. मात्र, या मालिकेतल्या विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड करणे ...

Ajinkya Raut was elected to play the role of Vithu-wali in the 550-odd auditions | ५५० जणांच्या ऑडिशन्समधून विठूमाऊलीची भूमिका साकारण्यासाठी अजिंक्य राऊतची झाली निवड

५५० जणांच्या ऑडिशन्समधून विठूमाऊलीची भूमिका साकारण्यासाठी अजिंक्य राऊतची झाली निवड

टार प्रवाहची पौराणिक नवी मालिका 'विठूमाऊली'ने अल्पावधीतच महाराष्ट्रावर गारूड केले आहे. मात्र, या मालिकेतल्या विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड करणे हे मोठे आव्हान होते. तब्बल ५५० कलाकारांची ऑडिशन झाल्यानंतर विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी अजिंक्य राऊत या नव्या अभिनेत्याची निवड झाली.
विठूमाऊली या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून स्टार प्रवाहवर ३० ऑक्टोबरपासून एक नवे पर्व सुरू झाले आहे. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले विठूमाऊलीचे दररोज तिन्हीसांजेला घराघरांत दर्शन होत आहे. वेगळं कथानक, भव्यता सादरीकरण आणि उच्च निर्मितीमूल्यांमुळे ही मालिका महाराष्ट्राच्या आणि विठ्ठलभक्तांच्या पसंतीला उतरत आहे. या मालिकेद्वारे अजिंक्य राऊत या नवोदित अभिनेत्याला विठूमाऊली साकारण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. त्याच्या अभिनय प्रवासातली ही सर्वांत मोठी भूमिका आहे.
अजिंक्यच्या निवडीबद्दल मालिकेचे निर्माते महेश कोठारे सांगतात, 'विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी आम्हाला नवा चेहरा हवा होता. कारण, प्रेक्षकांना माहीत असलेल्या अभिनेत्याला प्रेक्षक विठूमाऊली म्हणून कसे स्वीकारतील हा प्रश्न होता. त्यामुळे या भूमिकेसाठी आम्ही नव्या अभिनेत्याचा शोध घेत होतो. जवळपास ५५० ऑडिशन्स घेऊन झाल्या. तरीही हवा तसा अभिनेता सापडत नव्हता. त्यावेळी आमची टीम पंढरपूरला गेली आणि विठूमाऊलीच्या पायावर डोके ठेवून 'विठूमाऊली सापडू दे' असे साकडं घातलं. त्यानंतर आमची टीम मुंबईला परतली आणि ऑडिशनमध्ये आम्हाला अजिंक्य राऊत हा अभिनेता सापडला. अजिंक्य हा उत्तम अभिनेता आहेच; मात्र त्याचे डोळे बोलके आहेत. त्याचे दिसणेही विठूमाऊलीला साजेसे होते.'
आजवर स्टार प्रवाहने कायमच आशयसंपन्न मालिका सादर केल्या आहेत. ‘विठूमाऊली’ या मालिकेच्या रूपाने स्टार प्रवाह अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. लोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहीत नसलेली विठ्ठलाची कहाणी या मालिकेतून सादर केली जात आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातले नातेही ही मालिका उलगडत आहे. विठूमाऊली या मालिकेच्या रूपाने एक भव्यदिव्य कथानक प्रेक्षकांसमोर आले आहे. विठ्ठलाचा महिमा जितका भव्य आहे, तशीच ही मालिकाही भव्यदिव्य आहे. या मालिकेसाठी खास कॉस्च्युम आणि ज्वेलरी डिझायनिंग करण्यात आले आहे. उच्च दर्जाच्या कॉम्प्युटर ग्राफिक्सची जोडही या मालिकेला मिळाली असल्याने कथानकातली भव्यता प्रत्यक्ष अनुभवता आली आहे.

Also Read : पंढरपूरमध्ये अवतरली 'विठूमाऊली'

Web Title: Ajinkya Raut was elected to play the role of Vithu-wali in the 550-odd auditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.