'नवरी मिळे हिटलरला'मधील एजे आणि लीलाच्या मेहंदीत 'अप्सरे'चा धमाका!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 02:22 PM2024-04-27T14:22:24+5:302024-04-27T14:22:54+5:30

Navari Mile Hitlerla : 'नवरी मिळे हिटलर'ला मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. एजे आणि लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते आहे. मालिकेत एजे आणि लीलाचा साखरपुडा पार पडल्यानंतर आता मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे.

AJ and Leela's mehndi in 'Nawari Mile Hitlerla', Sonalee Kulkarni will be seen in serial | 'नवरी मिळे हिटलरला'मधील एजे आणि लीलाच्या मेहंदीत 'अप्सरे'चा धमाका!

'नवरी मिळे हिटलरला'मधील एजे आणि लीलाच्या मेहंदीत 'अप्सरे'चा धमाका!

नवरी मिळे हिटलरला मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे, एजे आणि लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते आहे, मालिकेत एजे आणि लीला ही इम्परफेक्ट जोडी एकत्र येईल का सर्वांचे लक्ष लागले आहे. दोघांचा साखरपुडा पार पडल्यानंतर आता मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. 

जसा साखरपुडयात ट्विस्ट आला होता तसेच मेहंदीमध्ये हंगामा होणार का? एजे आणि लीलाचे लग्नकार्य विना अडथळा पार पडणार का ? ही जोडी इतर जोड्यांपेक्षा वेगळी आहे. मेहंदीमध्ये लीलाने एक घोळ घातला आहे. पण ती ह्या घोळात एकटी नाही. जहागीरदारांची इज्जत रस्त्यावर आणण्यासाठी कोणाचे प्रयत्न चालू आहेत हे येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. हा सगळा गोंधळ एकीकडे चालू असताना ही मेहेंदीची लगबग सुरु आहे. 


एजेचा मेहेंदी सोहळा हा साधा नक्कीच नसणार. या सोहळयात मराठी सिनेइंडस्ट्रीतला एक प्रसिद्ध चेहरा हजेरी लावणार आहे. हो या मेहेंदी सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास परफॉर्मन्स होणार आहे. पण एजेच्या सुना- दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या लीला ही त्यांची सासू होणार आहे, या विचाराने निराश आहेत. अभिराम जहागीरदार आणि लीलाचा मेहंदी सोहळा निर्विघ्न संपन्न होईल का? आणि संपन्न झाला तरी  ह्या दोघांचं लग्न होईल? एजेच्या सुना ह्या लग्नामध्ये काही अडथळे आणतील का? हे पाहणे खूप रंजक असणार आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मेहंदी विशेष भाग रविवार २८ एप्रिल रात्री १० वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: AJ and Leela's mehndi in 'Nawari Mile Hitlerla', Sonalee Kulkarni will be seen in serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.