ऐश्वर्या राय बच्चन नाही तर बिग बी अमिताभ बच्चनच करणार कौन बनेगा करोडपती 9 पर्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 17:01 IST2017-06-01T11:31:32+5:302017-06-01T17:01:32+5:30

देवीयों और सज्जनो ! हे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला. रियालिटी शो ...

Aishwarya Rai Bachchan, Big B Amitabh Bachchan will do Kaun Banega Crorepati 9th festival! | ऐश्वर्या राय बच्चन नाही तर बिग बी अमिताभ बच्चनच करणार कौन बनेगा करोडपती 9 पर्व!

ऐश्वर्या राय बच्चन नाही तर बिग बी अमिताभ बच्चनच करणार कौन बनेगा करोडपती 9 पर्व!

वीयों और सज्जनो ! हे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला. रियालिटी शो 'कौन बनेगा करोडपती' च्या माध्यामाने सा-यांचच तुफान मनोरंजन झालं. आता पुन्हा एकदा 'कौन बनेगा करोडपतीचे 9 पर्वाला सुरूवात होणार आहे.मात्र यंदाच्या पर्वात सुत्रसंचलानाची जबाबदारी अमिताभ बच्चन नाही तर त्यांची बहुरानी ऐश्वर्या राय बच्चन यावेळी स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसणार आहे अशी चर्चा रंगत होती. मात्र या बातमीत कोणतीही सत्यता नसून अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करणार  असल्याची माहिती मिळतेय.अमिताभ बच्चन यांच्यामुळेच हा शो आजवर टॉप रिअॅलिटी शोमध्ये राहिला आहे.एरव्ही अमिताभ बच्चन यांच्या जागी इतर सेलिब्रेटी आपले नशीब आजमताना दिसले होते.मात्र तो प्रयोगही फसला.त्यामुळे हॉटसीटवर आहे फक्त शहेनशहाचं राज्य म्हणत बिग बी अमिताभ बच्चन रसिकांच्या भेटीला येणार आहेत.ज्ञान हेच तुम्हांला पैसा मिळवून देऊ शकतो ही थीम घेऊन यंदाही केबीसीच्या सेटवर फक्त आणि फक्त बिग बी अमिताभ बच्चन यांचेच राज्य पाहायला मिणार आहे. ऑगस्ट महिन्यात या शोच्या शूटिंगला सुरूवात होणार अाहे.

 गेली चार दशकं आपला अभिनय, स्टाईल, आवाज आणि विनम्रता याच्या जोरावर बिग बींनी रसिकांच्या काळजात अढळ स्थान प्राप्त केलंय... यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचताना महानायकाला आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.. सात हिंदुस्थानी हा पहिला सिनेमा मिळवण्यापासून ते कौन बनेगा करोडपती पर्यंतच्या प्रवासात बिग बींनी यश आणि सामान्यांप्रमाणे कर्जाच्या संकटाचाही अनुभव घेतला.. तरीही बिग बी डगमगले नाहीत आणि पुन्हा एकदा यशशिखर गाठलं.. आजच्या तरुण नायकालाही लाजवेल असा उत्साह आणि मेहनत करण्याची क्षमता बिग बींमध्ये आहे.. त्यामुळंच उतारवयातही बिग बींना केंद्रस्थानी ठेवून सिनेमा बनवले जातात आणि ते हिटही होतात.त्यामुळे रूपेरी पडद्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरही बिग बी कधी झळकणार याचीच वाट पाहात असतात. त्यामुळे कौन बनेगा करोडपती या शोचीही रसिकांना खूप उत्सुकता लागली आहे.

Web Title: Aishwarya Rai Bachchan, Big B Amitabh Bachchan will do Kaun Banega Crorepati 9th festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.