'रमा-राघव' मालिकेतील ऐश्वर्या आणि निखिल यांच्यात आहे ऑफस्क्रीन अशी केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 21:26 IST2023-03-27T21:26:09+5:302023-03-27T21:26:22+5:30

Rama-Raghava Serial : रमा - राघव ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Aishwarya and Nikhil in 'Rama-Raghava' show off-screen chemistry | 'रमा-राघव' मालिकेतील ऐश्वर्या आणि निखिल यांच्यात आहे ऑफस्क्रीन अशी केमिस्ट्री

'रमा-राघव' मालिकेतील ऐश्वर्या आणि निखिल यांच्यात आहे ऑफस्क्रीन अशी केमिस्ट्री

कलर्स मराठीवर सुरु असलेली रमा - राघव ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्याच्या सुरू आलेल्या मालिकांपेक्षा वेगळे आणि चौकटी बाहेर जाऊन काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न मालिका करते आहे.  मुख्य म्हणजे या मालिकेद्वारे मराठी टेलिव्हिजनवर एक नवी फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रमा राघवची जोडी आपल्या इतर जोड्यापेक्षा वेगळी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्यातील भांडणं, रुसवे फुगवे, तू तू मे मे, त्यांच्यातील केमिस्ट्री यामुळेच या जोडीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली.

रमाचे अटीट्युड, तिचा खट्याळपणा, तिच्यातील अवखळपणा, हळवा स्वभाव अश्या अनेक छटा आपल्याला मालिकेत दिसल्या ज्यामुळे ते पात्र आपल्याला भावलं. राघवचा समंजस, संयमी, शांत, लाघवी स्वभाव आपल्याला कुठेतरी आपलासा वाटला. मालिकेत  कधी खट्याळ तर कधी  गोड असे रमा राघव म्हणजेच ऐश्वर्या आणि निखिल यांची ऑफ स्क्रीन देखील धम्माल मस्ती सुरु असते. यांना सेटवर टॉम अँड जेरी असं देखील म्हणतात.

 ऐश्वर्या यावर बोलताना म्हणाली, "आमच्या सेटवर बऱ्याच गंमती जमती घडतं असतात. पालीमध्ये शूट सुरू असताना रमाला मस्ती करावीशी वाटली म्हणून निखिल वर प्रँक करावा असं डोक्यात आलं आणि मी त्याच्या हॉटेलच्या रूमचा दरवाजा वाजवला आणि लपले... मी त्रास दिला त्याला खूप. पण खरं सांगायचं झालं तर याचवेळी आमचा एक सीन होता ज्यात मी पाण्याच्या कुंडात पडते ज्यावेळेस मला खूप त्रास झाला होता तेव्हा निखिलने मला खूप सांभाळून घेतलं. आम्ही मालिकेत भांडतो तसे ऑफ स्क्रीन देखील भांडत असतो... आमचं बॉण्डिंग खूप छान आहे त्यामुळे ते मालिकेत अत्यंत सुंदर पध्दतीने दिसून येत आणि तेच प्रेक्षकांना आवडतं असं मला वाटतं".

Web Title: Aishwarya and Nikhil in 'Rama-Raghava' show off-screen chemistry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.