"उलझा जिया", शाहिद कपूर-क्रिती सेनॉनच्या गाण्यावर थिरकलं नारकर कपल! ऐश्वर्या आणि अविनाश यांचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 01:31 PM2024-02-07T13:31:52+5:302024-02-07T13:32:36+5:30

ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवणाऱ्या नारकर कपलला आता 'उलझा जिया' गाण्याची भुरळ पडली आहे. 

aishwarya and avinash narkar dance on shahid kapoor kriti sanon song uljha jiya video viral | "उलझा जिया", शाहिद कपूर-क्रिती सेनॉनच्या गाण्यावर थिरकलं नारकर कपल! ऐश्वर्या आणि अविनाश यांचा व्हिडिओ व्हायरल

"उलझा जिया", शाहिद कपूर-क्रिती सेनॉनच्या गाण्यावर थिरकलं नारकर कपल! ऐश्वर्या आणि अविनाश यांचा व्हिडिओ व्हायरल

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एव्हरग्रीन कपल आहेत. कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या जोडीने त्यांच्या अभिनयाने एक काळ गाजवला. पण, आताही ते अभिनय क्षेत्रात तितकेच सक्रिय आहेत. अभिनयाबरोबरच ऐश्वर्या आणि अविनाश चर्चेत असतात ते त्यांच्या रील्समुळे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवणाऱ्या नारकर कपलला आता 'उलझा जिया' गाण्याची भुरळ पडली आहे. 

डान्स आणि व्हिडिओंनी लक्ष वेधून घेणारे नारकर कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या ट्रेंडिंग असलेल्या 'उलझा जिया' या गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत शाहिद आणि क्रितीच्या हुक स्टेप करताना दिसत आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश यांच्याबरोबर अभिनेत्री अश्विनी कासारही या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत असलेला 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा असून अमित जोशी आणि आराधना साह यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ९ फेब्रुवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: aishwarya and avinash narkar dance on shahid kapoor kriti sanon song uljha jiya video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.