अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अमिषा पटेल दिसणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 13:26 IST2017-11-21T07:56:55+5:302017-11-21T13:26:55+5:30

अमिषा पटेलने कहो ना प्यार है या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. या ...

After working in several films, Ameesha Patel will be seen in the series | अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अमिषा पटेल दिसणार या मालिकेत

अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अमिषा पटेल दिसणार या मालिकेत

िषा पटेलने कहो ना प्यार है या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तसेच या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असलेला हृतिक रोशन आणि तिची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. अमिषाने त्यानंतर गदर-एक प्रेमकथा, हमराज यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण गेल्या काही वर्षांपासून अमिषा चित्रपटांपासून दूर आहे. तिला अनेक वर्षांपासून एकही हिट चित्रपट देता आलेला नाही. मोठ्या पडद्यावर मिळालेल्या अपयशानंतर अमिषा आता प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पण छोट्या पडद्यावर ती महत्त्वाच्या भूमिकेत नव्हे तर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे ही मालिका विक्रम भट्ट यांची आहे. विक्रम भट्ट आणि अमिषाच्या अफेअरविषयी सगळ्यांनाच माहीत असल्याने विक्रम यांच्या मालिकेत आमिषा काम करतेय हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
विक्रम भट्ट यांच्या दिल संभल जा जरा या मालिकेमध्ये अमिषा कॅमिओ करणार आहे. विक्रम भट्ट यांनी सुश्मिता सेन आणि अमिषा पटेल यांच्यासोबतच्या आपल्या नातेसंबंधांची जाहीर चर्चा केली होता, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. पण त्यावेळी विक्रम यांचे कुटुंब त्याच्या पाठिशी उभे राहिले आणि या सगळ्यातून बाहेर पडायला त्यांना मदत केली. विक्रम भट्ट हे अतिशय प्राफेशनल असल्याचे ते आता सगळ्यांना दाखवून देणार आहेत. कारण विक्रम आपल्या पूर्व प्रेयसीसोबत आपल्या दिल संभल जा जरा या मालिकेसाठी काम करणार आहेत. विक्रम भट्ट यांच्या या मालिकेमध्ये अमिषा पटेल संजय कपूरची लव्ह इंटरेस्ट असलेल्या मुलीची भूमिका करणार आहे. विक्रम यांनी अमिषासोबत या कथानकावर चर्चा केली असून ते ११ वर्षांच्या मोठ्‌या ब्रेकनंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत. दिल संभल जा ही मालिका विक्रम भट्ट सारख्या बॉलिवूडमधील आघाडीच्या दिग्दर्शकाची असल्याने टेलिव्हिजन पदार्पणासाठी अमिषाला खूप चांगली मालिका मिळाली असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

Also Read : अमिषा पटेलचे लेटेस्ट फोटोशूट!

Web Title: After working in several films, Ameesha Patel will be seen in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.