प्राजक्ता माळीनंतर गौरव मोरेने घेतला महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ब्रेक, म्हणाला-...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 03:48 PM2022-09-26T15:48:50+5:302022-09-26T15:53:02+5:30

प्राजक्ता माळीनंतर गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून ब्रेक घेतल्याचं कळतंय. गौरवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे

After Prajakta Mali, Gaurav More took a break from Maharashtra's comedy fair, the reason came to light | प्राजक्ता माळीनंतर गौरव मोरेने घेतला महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ब्रेक, म्हणाला-...

प्राजक्ता माळीनंतर गौरव मोरेने घेतला महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ब्रेक, म्हणाला-...

googlenewsNext


महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एक हरहुन्नरी कलाकार आणि ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणजे गौरव मोरे. सध्या गौऱ्या म्हणजे चाहत्यांचा लाडका कलाकार. त्याच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत.‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून त्यानं मालिकाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तो विनोदी भूमिका करत होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रामधून. यानंतर गौरवने कधीच मागे वळून पाहिले नाही. गौरवाचं मराठी चित्रपट आणि मालिकेतील त्याचं काम पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याला संधी मिळाली. संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपटातील त्याच्या कामाची चांगली वाहवा झाली.

प्राजक्ता माळीनंतर गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून ब्रेक घेतल्याचं कळतंय. गौरवने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यावरुन हा अंदाज लावण्यात येतोय. गौरवने त्याच्या एअरपोर्टवरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो भरत जाधवसोबत दिसतोय. गौरव त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाला आहे. 

 

गौरव मोरेची पोस्ट
''सुपरस्टार @sahibharat sir सह मराठी फिल्मसाठी लंडनला जात आहे. उत्साही आहे, जाम भरी वाटतंय. ज्यांना बाल्कनीमधून बघितलं आणि आज एकत्र प्रवास करतोय फार भारी वाटतंय. भेटूया लवकरच..'' अशी पोस्ट गौरवने केली आहे.  गौरव कोणत्या सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला चालला आहे हे मात्र त्याने सांगितलं नाही.

Web Title: After Prajakta Mali, Gaurav More took a break from Maharashtra's comedy fair, the reason came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.