​अखेर तारक मेहता का उल्टा चष्मामधील पोपटलालचे झाले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 13:42 IST2017-06-20T08:10:40+5:302017-06-20T13:42:31+5:30

पोपटलालचे लग्न कधी होणार हा प्रश्न केवळ गोकुळधाम सोसायटीच्या लोकांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांना देखील पडला आहे. ही मालिका ...

After all, Tarak Mehta got Parathlal's wedding in the glasses | ​अखेर तारक मेहता का उल्टा चष्मामधील पोपटलालचे झाले लग्न

​अखेर तारक मेहता का उल्टा चष्मामधील पोपटलालचे झाले लग्न

पटलालचे लग्न कधी होणार हा प्रश्न केवळ गोकुळधाम सोसायटीच्या लोकांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांना देखील पडला आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून पोपटलालदेखील कोणतीही नवीन मुलगी पाहाताच तिला लग्नाची मागणी घालतो असे आपल्याला पाहायला मिळाले आहे. आजवर अनेकवेळा पोपटलालचे लग्न होणार असे आपल्याला वाटले. पण शेवटी काहीतरी समस्या निर्माण झाली आणि पोपटलाल काही बोहल्यावर चढला नाही. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे.
तारक मेहता क उल्टा चष्मा या मालिकेतील पोपटलालचे अखेर इतक्या वर्षांनी लग्न होणार असल्याचे कळतेय. पोपटलाल काही दिवसांपूर्वी झिलमिल या मुलीला पाहायला गेला होता. तो पत्रकार आहे ही गोष्ट तिला खूप आवडली होती. तू पत्रकार असल्याने अनेक चित्रपटातील कलाकारांना तू भेटत असशील ना असा प्रश्न तिने पोपटलालला विचारला होता. त्यावर पोपटलालने होकारार्थी उत्तर दिल्यावर तिने सलमान खानबाबत त्याला विचारले होते. पोपटलालनेदेखील यावर सलमान खानला तर मी गोकुळधाम सोसायटीत दोनदा आणले आहे असे उत्तर दिले होते. पण हे ऐकल्यावर झिलमिलने मला सलमानसोबत भेटव आणि त्याच्यासोबत सेल्फी काढून दे तर मी तुझ्याशी लग्न करेन असे पोपटलालला सांगितले होते. यावर पोपटलालने देखील मी तुला सलमानला भेटवतो असे तिला सांगितले होते आणि त्याने सलमान आणि तिची भेट देखील घडवून आणली. 
आता पोपटलालने झिलमिलची ही इच्छा पूर्ण केल्यानंतर त्या दोघांचे लग्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत झिलमिलची व्यक्तिरेखा तन्वी मध्यान साकारणार आहे. 

Must read : तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सलमान खानमुळे होणार पोपटलालचे लग्न?

Web Title: After all, Tarak Mehta got Parathlal's wedding in the glasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.