२५ वर्षांनंतर पुन्हा येतेय 'शा..लि..नी..!', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' उत्कंठावर्धक वळणावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 11:51 AM2024-01-03T11:51:22+5:302024-01-03T11:51:41+5:30

Sukh Mhanje Nakki Kay Asata : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत जयदीप-गौरीसोबत शिर्के-पाटील कुटुंबांतील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती. आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास २५ वर्षांनंतर ती पुन्हा कोल्हापुरात परतणार आहे

After 25 years, 'Sha..li..ni..!' comes back, 'Happiness is exactly what it is' in an exciting twist. | २५ वर्षांनंतर पुन्हा येतेय 'शा..लि..नी..!', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' उत्कंठावर्धक वळणावर

२५ वर्षांनंतर पुन्हा येतेय 'शा..लि..नी..!', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' उत्कंठावर्धक वळणावर

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेच्या नवीन पर्वाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. जयदीप-गौरी प्रमाणेच नित्या आणि अधिराज ही जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत नव्या कथानकासोबत अनेक नवीन पात्रेही भेटीला आली आहेत. मात्र ज्या पात्राला गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पहायचे होते त्या शालिनी शिर्के-पाटीलची लवकरच मालिकेत एण्ट्री होणार आहे. 

जयदीप-गौरीसोबत शिर्के-पाटील कुटुंबांतील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती. आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास २५ वर्षांनंतर ती पुन्हा कोल्हापुरात परतणार आहे. इतक्या वर्षांच्या काळात शालिनी कुठे होती? काय करत होती? याची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमधून उलगडतीलच मात्र शालिनीच्या पुन्हा येण्याने मालिकेत नवीन नाट्य घडताना दिसेल.

शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा नव्याने शालिनी साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. नव्या रुपात आणि नव्या मनसुब्यांसह शालिनी पुन्हा येतेय. २५ वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर तिच्या रहाणीमानात बरेच बदल झाले आहेत. इतके दिवस आपण शालिनीला साडीमध्ये आणि अस्खलित कोल्हापुरी भाषा बोलताना पाहिले आहे. मात्र आता शालिनीचा मॉडर्न अंदाज पहायला मिळेल. एकाच पात्रामध्ये दोन वेगळे लूक मला साकारायला मिळत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून मालिकेत परत कधी येणार याची विचारणा होत होती. मला प्रेक्षकांना सांगायला अतिशय आनंद होतोय की शालिनी पुन्हा येतेय अशा शब्दात माधवीने आपली भावना व्यक्त केली. २५ वर्षांनंतर शालिनीचा स्वभाव बदलला आहे की अजूनही तिच्या मनात सुडाची भावना आहे का, हे लवकरच कळेल. 

Web Title: After 25 years, 'Sha..li..ni..!' comes back, 'Happiness is exactly what it is' in an exciting twist.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.