10 वर्षांच्या लिव्ह इन रिलेशनशिपनंतर या टिव्ही अभिनेत्रीने केले प्रियकराशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 12:20 IST2016-12-13T11:24:56+5:302016-12-13T12:20:03+5:30

'भाभीजी घर पर है' फेम सौम्या टंडन म्हणजेच अनिता भाभीने गुपचुप लग्न केल्याचे कळतेय. गेल्या 10 वर्षापासून बँकर सौरभ ...

After the 10-year live-in relationship, this TV actress has married a lovely girl | 10 वर्षांच्या लिव्ह इन रिलेशनशिपनंतर या टिव्ही अभिनेत्रीने केले प्रियकराशी लग्न

10 वर्षांच्या लिव्ह इन रिलेशनशिपनंतर या टिव्ही अभिनेत्रीने केले प्रियकराशी लग्न

'
;भाभीजी घर पर है' फेम सौम्या टंडन म्हणजेच अनिता भाभीने गुपचुप लग्न केल्याचे कळतेय. गेल्या 10 वर्षापासून बँकर सौरभ देवंद्र सिंहसह सौम्या लिव्ह इनमध्ये राहत होती. कॉलेजपासूनच सौम्या सौरभची चांगली मैत्री होती. दहा वर्षापासून एकमेकांना चांगले ओळखत असल्यामुळे विवाहबंधनात अडकल्याचे कळतेय. मुंबईत लग्नाचा सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. दोन्ही फॅमिलीतील सदस्य, नातेवाईक आणि निवडक मित्र यांचा समावेश होता. मात्र याविषयी सौम्याने बोलण्यास नकार दिलाय. मी माझ्या खाजगी आयुष्यात काय करते कुठे जाते याविषयी दुस-यांना का सांगु माझे आयुष्य हे माझ्यापुरतेच मर्यादित राहु द्या उगाच माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका अशा शब्दांत तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. जानेवारी महिन्यात हे दोघे कपल हनीमुनसाठी जाणार आहेत. 

काही दिवासांआधी सौम्याने एका  वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सौरभविषयी भऱभरून बोलली होती. तिच्या आयुष्यात येणा-या चढऊतारांमध्ये सौरभनेच तिला सांभाळून घेतले, तिची साथ दिली.नेहमीच तो मझ्या एक मार्गदर्शक म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिला. जितका तो मला समजून घेतो त्याची जागा माझ्यासाठी दुसरे कोणीही घेवू शकत नसल्याचे सौम्याने यावेळी म्हटले होते.सौरभ त्याच्या कामाच्या निमित्ताने परदेशात होता. फक्त आणि फक्त सौम्यासाठीच तो परदेशातून भारतात परतला आहे. त्यावेळी लग्न कधी करणार असा प्रश्न सौम्याला विचारण्यात आला होता. त्यावेळी सध्या आम्ही दोघेही आमच्या कामात बिझी आहोत. जेव्हा योग्यवेळ येईल असे दोघांनाही वाटेन ते्वाह आम्ही लग्न करणार असल्याचे तिने म्हटेल होते. त्यानुसारच योग्यवेळी योग्य निर्णय घेत सौम्यान कोणालाही खबर न लागता गुपचुप विवाह केला. सौम्याही इतर कलाकालारांप्रमाणे  तिच्या  आयुष्याची नवी सुरूवात केली आहे तिला तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शभेच्छा ! 

Web Title: After the 10-year live-in relationship, this TV actress has married a lovely girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.