‘द व्हॉइस’मध्ये अदनान सामीने दिले 'या' गायिकेला विशेष परीक्षकाचे निमंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 16:42 IST2019-03-14T16:19:21+5:302019-03-14T16:42:45+5:30

खा भारद्वाज आणि अदनान सामी यांनी अनेक डुएट साँग्स गायली असून त्यांची ही जोडी अनेक वर्षे लोकप्रिय राहिली आहे.

Adnan sami invited rekha bhardwaj as a special mentor on The Voice | ‘द व्हॉइस’मध्ये अदनान सामीने दिले 'या' गायिकेला विशेष परीक्षकाचे निमंत्रण!

‘द व्हॉइस’मध्ये अदनान सामीने दिले 'या' गायिकेला विशेष परीक्षकाचे निमंत्रण!

ठळक मुद्दे रेखा भारद्वाज यांच्या चर्चा करण्यास हे स्पर्धक खूपच उत्सुक होते

‘द व्हॉइस’मधील सर्वच स्पर्धक आता दुसऱ्या फेरीत आपल्याच संघातील प्रतिस्पर्ध्याबरोबर स्पर्धा करण्यास सिध्द होत आहेत. या संघर्षासाठी कार्यक्रमाचे प्रशिक्षक अदनान सामी, कनिका कपूर, अरमान मलिक आणि हर्षदीप कौर यांनी आपापल्या स्पर्धकांची कसून तयारी करून घेतली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रशिक्षकाने एका नावाजलेल्या संगीतकाराची मदत घेतली आहे. यातील एक प्रशिक्षक अदनान सामी याने आपल्या संघातील स्पर्धकांना आपली मैत्रीण नामवंत सूफी गायिका आणि बॉलिवूडची पार्श्वगायिका रेखा भारद्वाज यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे.

रेखा भारद्वाज आणि अदनान सामी यांनी अनेक डुएट साँग्स गायली असून त्यांची ही जोडी अनेक वर्षे लोकप्रिय राहिली  आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा केवळ या स्पर्धकांची भेटच घेतली असे नव्हे, तर त्यांना आपल्या जीवनातील आजवर अज्ञात असलेली बाजू सांगितली आणि त्यातून त्यांना उत्तम कामगिरीसाठी प्रेरणा दिली. रेखा भारद्वाज यांच्या चर्चा करण्यास हे स्पर्धक खूपच उत्सुक होते. या कठीण स्पर्धेत उमेदवारांना आपली सर्वोत्तम कामगिरी करता यावी, यासाठी तिने अदनानला जमेल ती सर्व मदत केली. 

स्टार प्लस वाहिनीवरील ‘द व्हॉइस’मध्ये रेखा आणि अदनान यांच्यासारखे दोन गंभीर आवाज असलेले गायक एकत्र पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरेल. यातील स्पर्धकांची उत्कृष्ट कामगिरी आणि परीक्षकांमधील हास्यमस्करीमुळे या कार्यक्रमाने प्रेक्षकांना आपल्यशी बांधून ठेवले आहे.

Web Title: Adnan sami invited rekha bhardwaj as a special mentor on The Voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.