​छोट्या पडद्यावर आदित्यची ‘बाईक आशिकी’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 13:11 IST2016-07-21T07:41:32+5:302016-07-21T13:11:32+5:30

रुपेरी पडद्यावर गाजलेल्या कलाकारांनी छोट्या पडद्यावर एंट्री मारणं ही काही नाही नवी गोष्ट राहिली नाही. सलमान खान, अक्षय कुमार, ...

Aditya's 'Bike Aashiqui' on small screen! | ​छोट्या पडद्यावर आदित्यची ‘बाईक आशिकी’ !

​छोट्या पडद्यावर आदित्यची ‘बाईक आशिकी’ !

पेरी पडद्यावर गाजलेल्या कलाकारांनी छोट्या पडद्यावर एंट्री मारणं ही काही नाही नवी गोष्ट राहिली नाही. सलमान खान, अक्षय कुमार, शाहरुख खानपासून ते आजच्या पिढीच्या अर्जुन कपूरपर्यंतच्या प्रत्येक कलाकारानं छोट्या पडद्यावर विविध शोच्या माध्यमातून एंट्री मारलीय. आता याच यादीत नाव जोडलं जातंय ते आशिकी-2 स्टार फेम आदित्य रॉय कपूरचं.लवकरच आदित्य रॉय कपूर एका साहसी प्रकारच्या टीव्ही शोमधून छोट्या पडद्यावर एंट्री मारणार आहे.या शोमध्ये तो बाईकस्वारी करताना पाहायला मिळेल. आजवर आदित्यनं विविध सीन्समध्ये बाईकवरुन एंट्री मारल्याचं रुपेरी पडद्यावर रसिकांनी पाहिलंय. त्याचं बाईक प्रेमसुद्धा जगजाहीर आहे.. याच बाईक प्रेमानं टीव्ही शो निर्मात्यांवरही मोहिनी घातली. त्यामुळं तरुणाईवर आधारित या बाईक शोची ऑफर आदित्य रॉय कपूरला देण्यात आलीय.. यांत दिल्ली किंवा मनालीपासून लेह लडाखपर्यंत आदित्य बाईकस्वारी करताना पाहायला मिळेल. त्यामुळं आदित्यची ही बाईक आशिकी छोट्या पडद्यावरील रसिकांनाही भावते का हे पाहावं लागेल.

Web Title: Aditya's 'Bike Aashiqui' on small screen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.