‘काळभैरव रहस्य’मालिकेत ही अभिनेत्री करणार एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 17:11 IST2017-11-20T11:41:59+5:302017-11-20T17:11:59+5:30
‘काळभैरव रहस्य’या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकण्यास सुरूवात केला आहे. मालिकेतील कथा आणि कलाकारांचा भूमिकेमुळे या मालिकेला रसिकांची पसंती ...

‘काळभैरव रहस्य’मालिकेत ही अभिनेत्री करणार एंट्री
‘ ाळभैरव रहस्य’या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकण्यास सुरूवात केला आहे. मालिकेतील कथा आणि कलाकारांचा भूमिकेमुळे या मालिकेला रसिकांची पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.मालिकेत आता आणखीन एका अभिनेत्री एंट्री होणार आहे. आपल्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळविलेली अभिनेत्री सुनीला करंबेळकर या मालिकेत शक्तीदेवीची भूमिकेत झळकणार आहे. सुनीलाला यासंदर्भात विचारले असता तिने सांगितले की, “या मालिकेतल्या शक्तीदेवीची भूमिका साकारणार म्हणजे एक वेगळा अनुभव मिळवणे असे मी मानते.शक्तीदेवी गेली 14 वर्षं तुरुंगात आहे. कोणताही त्रागा न करता किंवा न संताप न करता एखाद्या समस्येवर तोडगा काढण्याचं कसब तिच्याकडेच असतं. ती अतिशय चलाख आणि झटपट विचार करणारी असते.ज्यात तिचा फायदा असतो, अशा गोष्टी ती कसंही करून साध्य करतेच. ही एक शक्तिशाली व्यक्तिरेखा असून 'काळभैरव रहस्य' मालिकेत मला भूमिका साकारावयास मिळाली,याचा मला आनंद होत आहे. मालिकेचे निर्माते धर्मेश शहा यांच्याबरोबरची माझी ही तिसरी मालिका आहे.ती सांगते, “या मालिकेतील संवादही ‘सबकी खबर रखें है शक्तीदेवी’ मनापासून आवडले आहेत. आणि आगामी काळात हेच संवाद रसिकांच्या पसंतीस उतरतील अनेक एव वेगळी ओळख निर्माण करेन अशी आशा तिला वाटते. मालिकेत राहुल शर्मा आणि छावी पांडे हे या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत.
मालिकेत राहुल शर्मा राहुलची, छावी पांडे नम्रताची, शगुन कौर गौरीची, इक्बाल खान इंद्राची, माधवी गोगटे कलावतीची, सोमेश अगरवाल वैद्याची आणि श्याम मशालकर मनोजची भूमिका साकारत आहे.मालिकेच्या सुरूवातीच्या काही भागाचे शूटिंग हे आऊटडोअर करण्यात आले होते. महेश्वर येथील शंकराच्या सुमारे 400 वर्षं जुन्या मंदिरात शूटिंग करण्यात आले होते. तिथलं वातावरण फारच अद्भुत होतं. यापूर्वी मी छायाचित्रणप्रमुख वीरू आणि धर्मेश यांच्याबरोबर काम केलं असून यावेळचा अनुभवही तितकाच उत्तम होता. या मालिकेच्या सार्या टीमला माझ्या शुभेच्छा.भावनात्मक आणि भव्यतेबाबत धर्मेश शहा सहसा चुकीचा ठरत नाही, याची मला खात्री आहे.”त्यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरेन असा विश्वास असल्याचे इंद्रची भूमिका साकारणारा इक्बालने सांगितले.