समाप्त! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा शेवट, अभिनेत्री स्वरदा ठिगळेने शेअर केली भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 10:47 IST2025-07-01T10:46:35+5:302025-07-01T10:47:00+5:30
स्वरदाने मुक्ता या भूमिकेतला आणि स्क्रीप्टचा फोटो शेअर करत लिहिले,

समाप्त! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा शेवट, अभिनेत्री स्वरदा ठिगळेने शेअर केली भावुक पोस्ट
स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेतील सर्वच स्टारकास्ट भावुक झाले आहेत. राज हंचनाळे, स्वरदा ठिगळे, अपूर्वा नेमळेकर या कलाकारांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत आहे. मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री स्वरदा ठिगळेनेही पोस्ट शेअर करत संपूर्ण प्रवास मांडला आहे.
स्वरदाने मुक्ता या भूमिकेतला आणि स्क्रीप्टचा फोटो शेअर करत लिहिले, ""पॅक अप... प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता म्हणून गेले सहा महिने मी काम केलं. आज माझा हा अतुलनीय प्रवास इथे संपला. यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. हा माझ्यासाठी प्रेरणादायी, परिपूर्ण आणि तितकाच आव्हानात्मक अनुभव होता. मी आईचं पात्र साकारलं जी अतिशय कणखर भूमिका होती. या भूमिकेला अनेक पैलू होते. आम्ही सर्वांनी मिळून केलेल्या कामाचा मला अभिमान वाटतो. प्रेमाची गोष्टच्या संपूर्ण टीमचे आभार. मला पाठिंबा देण्यासाठी आणि माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी स्टार प्रवाहचेही आभार. टॅलेंट आणि जिद्द यामुळे प्रत्येक आव्हान ही नवी संधीच वाटली आणि मी यातून खूप काही शिकले."
"हा चॅप्टर जरी संपत असला तरी मी असंख्य आठवणी घेऊन जात आहे. आयुष्य आणखी कुठे घेऊन जातं हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. तुम्हा सगळ्यांसाठी मी दुरुन चीअर करत राहीन. सर्वांना यश मिळो आणि पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळो ही आशा."
स्वरदा ठिगळे सहा महिन्यांपूर्वी मालिकेत आली होती. त्याआधी अभिनेत्री तेजश्री प्रधान मुक्ता ही भूमिका साकारत होती. तेजश्रीच्या अचानक मालिका सोडल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. आता तेजश्री झी मराठीवर नव्या मालिकेत दिसणार आहे.