अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं डबल नाताळ सेलिब्रेशन ! SEE PHOTOS
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 21:00 IST2018-12-23T21:00:00+5:302018-12-23T21:00:02+5:30
माझे पती ब्रिटिश संस्कृतीत लहानाचे मोठे झाले आणि तिथे नाताळ खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ह्या वेळेला आम्ही लंडनला साजरा करणार आहोत

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं डबल नाताळ सेलिब्रेशन ! SEE PHOTOS
नाताळ सेलिब्रेशन म्हटल्यावर महिन्याभरापूर्वीपासूनच सगळी तयारी सुरू असते. मग तो चित्रपटाचा सेट असो किंवा टीव्हीचा सेट. सेलिब्रिटींना या सणाची खास उत्सुकता असते. आता आमच्याकडे एका टीव्ही शोच्या सेटवरून काही फोटोज आणि त्यांचे सेलिब्रेशन पहावयास मिळत आहे.
यामध्ये मग ‘सुपर डान्सर ३’चे परीक्षक शिल्पा शेट्टी कुंद्रा, अनुराग बसू आणि गीता कपूर कसे मागे असतील? सगळे जण एकदा नाताळ साजरा करणार आहेत पण शिल्पा शेट्टी तर दोन वेळा साजरा करणार आहे. तिने सुपर डान्सर ३च्या सेटवर आपल्या सहपरीक्षकांबरोबर नाताळ साजरा केला आणि केकही कापला. सुपर डान्सर ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने ती काळ लंडनला रवाना झाली. तरी तिचे पती आणि मुलगा हे दोघे थोडे दिवस आधीच तिथे गेले आहेत. शिल्पा शेट्टी कुंद्रा, अनुराग बसू आणि गीता कपूर सांताची टोपी घातल्यामुळे खूपच सुंदर दिसत होते.
याबाबत बोलताना शिल्पा शेट्टी म्हणाली, ‘माझे पती ब्रिटिश संस्कृतीत लहानाचे मोठे झाले आणि तिथे नाताळ खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ह्या वेळेला आम्ही लंडनला साजरा करणार आहोत तर ‘सुपर डान्सर ३’च्या सेटवर एकदा आधीच बाकीच्या परीक्षकांबरोबर केक कापून झाला आहे.