नवीन वर्षात प्राजक्ताची स्वप्नपूर्ती! खरेदी केली महागडी गाडी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 10:53 AM2024-04-10T10:53:08+5:302024-04-10T10:53:37+5:30

प्राजक्ता गायकवाडने गुढीपाडव्यानिमित्त शानदार गाडी खरेदी केलीय. यानिमित्त प्राजक्ताचं सोशल मीडियावर सर्वांनी अभिनंदन केलंय (prajakta gaikwad)

actress Prajakta Gaikwad buy new hyundai car on gudhipadwa hindu new year | नवीन वर्षात प्राजक्ताची स्वप्नपूर्ती! खरेदी केली महागडी गाडी, व्हिडीओ व्हायरल

नवीन वर्षात प्राजक्ताची स्वप्नपूर्ती! खरेदी केली महागडी गाडी, व्हिडीओ व्हायरल

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ताला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यामातून चाहत्यांच्या चर्चेत असते. प्राजक्ताने नुकतीच एक शानदार गाडी विकत घेतलीय. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. 

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर काहीच वेळापुर्वी नवीन गाडी घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. प्राजक्ताने गाडी घेतानाचा शोरुममधील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोत प्राजक्ताची आई आणि तिचं कुटुंब दिसून येतंय. गाडी घेताना प्राजक्ता आणि तिचं कुटुंब आनंदात पाहायला मिळतं. प्राजक्ताने पांढऱ्या रंगाची हुंडाई गाडी विकत घेतलीय. 

नवीन गाडी घेतल्याबद्दल सर्वांनी प्राजक्ताचं अभिनंदन केलंय. प्राजक्ताने गाडी घेतल्यावर गाडीच्या रुफटॉपमधून बाहेर येत चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर... ती सध्या 'वीर मुरारबाजी' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. प्राजक्ता या सिनेमात कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याशिवाय ती अमोल कोल्हेंसोबत 'धर्मवीर संभाजी' या महानाट्यात अभिनय करत आहे.

Web Title: actress Prajakta Gaikwad buy new hyundai car on gudhipadwa hindu new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.