'ज्युबिली टॉकीज - शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मालिकेत झळकणार अभिनेत्री खुशी दुबे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 05:35 PM2024-05-18T17:35:47+5:302024-05-18T17:36:25+5:30

Jubilee Talkies - Shohrat. Shiddat. Mohabbat Serial : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’! ही एक रोमॅंटिक आणि उत्कट मालिका दाखल होणार आहे, ज्यात महाराष्ट्रातील एका छोट्या शहरातल्या शिवांगी सावंत नावाच्या विनम्र पण आधुनिक विचारसरणीच्या मुलीची गोष्ट सांगण्यात येणार आहे.

Actress Khushi Dubey will appear in the serial ''Jubilee Talkies - Shohrat. Shiddat. Mohabbat ' | 'ज्युबिली टॉकीज - शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मालिकेत झळकणार अभिनेत्री खुशी दुबे

'ज्युबिली टॉकीज - शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मालिकेत झळकणार अभिनेत्री खुशी दुबे

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ (Jubilee Talkies - Shohrat. Shiddat. Mohabbat Serial) ही एक रोमॅंटिक आणि उत्कट मालिका दाखल होणार आहे. ज्यात महाराष्ट्रातील एका छोट्या शहरातल्या शिवांगी सावंत नावाच्या विनम्र पण आधुनिक विचारसरणीच्या मुलीची गोष्ट सांगण्यात येणार आहे. तिला सिनेमाचे प्रचंड वेड आहे, यातूनच तिला आपल्या वडिलांच्या ‘संगम सिनेमा’ला भरभराटीचे दिवस पुन्हा मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करण्याची प्रेरणा मिळते.
 
या मालिकेत अभिनेत्री खुशी दुबे शिवांगी सावंत या नायिकेची भूमिका साकारणार आहे. शिवांगी ही शक्ती, प्रामाणिकपणा आणि एखाद्या प्रयोजनासाठी झटून काम करण्याच्या भावनेने भरलेली एक आधुनिक स्त्री आहे. आपल्या वडिलांच्या ‘संगम सिनेमा’चा वारसा तिलाच मिळालेला आहे. आव्हानांचा सामना करताना तिच्यातील दृढनिश्चय दिसून येतो आणि संगम सिनेमा हा तिच्यासाठी केवळ एक व्यवसाय नाही; तर एक अशी जागा आहे, जेथे स्वप्ने साकार होतात!

खुशी दुबे म्हणते, “ही गोष्ट मला फारच आवडली आहे! हे कथानक मला जेव्हा पाहिल्यांना विशद करण्यात आले, तेव्हा मी त्यात गुंगून गेले होते आणि मला वाटते, प्रेक्षकांची देखील हीच गत होईल. संगम सिनेमा पुनरुज्जीवित करण्याच्या ध्यासाबरोबरच शिवांगीच्या प्रवासात अनेक अनपेक्षित वळणे, आडवळणे आहेत ज्यातून आकार घेणारी शिवांगीची गोष्ट नक्कीच सगळ्यांना खिळवून ठेवेल. ही व्यक्तिरेखा माझ्या समोर आलेले हे नवे आव्हान आहे. आपले कुटुंब आणि स्वप्ने याबाबत शिवांगीची अढळ निष्ठा आणि चिकाटी या गुणांनी मला विशेष आकर्षित केले आहे.”

Web Title: Actress Khushi Dubey will appear in the serial ''Jubilee Talkies - Shohrat. Shiddat. Mohabbat '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.