अभिनेत्री खुशबू तावडेचे डोहाळे जेवण, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 02:12 PM2021-09-13T14:12:42+5:302021-09-13T14:14:34+5:30

अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी लवकरच आई बाबा होणार आहेत. आता खुशबूच्या डोहाळे जेवणाचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत.

Actress khushboo tawde baby shower pics video | अभिनेत्री खुशबू तावडेचे डोहाळे जेवण, पाहा फोटो

अभिनेत्री खुशबू तावडेचे डोहाळे जेवण, पाहा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्दे2018 मध्ये संग्राम आणि खुशबूने विवाह केला होता. ‘देवयानी’ या मालिकेमुळे संग्राम साळवी घराघरात पोहोचला. तर एक माहेर अबोल, तू भेटशी नव्याने, पारिजात, तेरे बिन, मेरे साई, आम्ही दोघी या मालिकेमुळे खुशबू तावडे टीव्हीची स्टार झाली.

अभिनेत्री खुशबू तावडे (Khushboo Tawde) आणि अभिनेता संग्राम साळवी (Sangram Salvi) लवकरच आई बाबा होणार आहेत. खुशबू-संग्रामने नुकतीच ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता खुशबूच्या डोहाळे जेवणाचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत.  खुशबू आणि तिची बहिण अभिनेत्री तीतिक्षा तावडे या दोघींनी डोहाळे जेवणाचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.
हिरवीकंच साडी, केसांत माळलेला गजरा, हातात हिरवा चुडा अशा थाटात खुशबू प्रचंड सुंदर दिसतेय. आई बनणार असल्याचा आनंद खुशबूच्या चेह-यावरून ओसंडून वाहतोय.  मावशी बनण्याच्या आनंदात तीतिक्षाचा चेहराही खुललाये.

 2018 मध्ये संग्राम आणि खुशबूने विवाह केला होता. ‘देवयानी’ या मालिकेमुळे संग्राम साळवी घराघरात पोहोचला. तर एक माहेर अबोल, तू भेटशी नव्याने, पारिजात, तेरे बिन, मेरे साई, आम्ही दोघी या मालिकेमुळे खुशबू तावडे टीव्हीची स्टार झाली. दोघांची भेट मालिकेच्या सेटवर झाली होती.


 
 संग्राम आणि खुशबू यांच्या मालिकांचे सेट आसपासच होता. त्यामुळे त्या दोघांची तोंडओळख होती पण खुशबूच्या मनात संग्रामबद्दची इमेज काही खास नव्हती. त्याला खूप अ‍ॅटिट्यूड आहे असं खुशबूला वाटायचं. त्यानंतर त्या दोघांनी एकत्र एका मालिकेत काम केलं.

तेव्हा संग्रामबद्दल खुशबूचं मत बदललं आणि त्यांच्यात मैत्री झाली. मालिकेत  संग्रामसोबत आपलं लग्न झालं नाही तर ती मालिका सोडेल अशी ताकीद खुशबूनं मालिकेच्या निर्मात्यांना दिली होती. कथानकामधील काही बदलामुळे  खुशबूचं लग्न संग्रामशी होऊ शकलं नाही आणि खरंच खुशबूने ती मालिका सोडली. त्याक्षणी संग्रामने ठरवलं की मालिकेत नाही पण खºया आयुष्यात तो खुशबूशीच लग्न करणार आणि त्याने खुशबूला लग्नाची मागणी घातली. 

Web Title: Actress khushboo tawde baby shower pics video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.