'शिवराज्याभिषेकासाठी रायगडी जा पण..'; मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 11:54 AM2024-06-06T11:54:17+5:302024-06-06T11:54:38+5:30

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (ashvini mahangade, shivrajyabbhishek)श

actress ashvini mahangade post for shivrajyabhishek 350th sohala shivaji maharaj | 'शिवराज्याभिषेकासाठी रायगडी जा पण..'; मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा संदेश

'शिवराज्याभिषेकासाठी रायगडी जा पण..'; मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा संदेश

आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण झाली आहेत. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील जनतेचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात. शिवरायांचा पराक्रम, शौर्य, धैर्य, धाडस असे अनेक गुण लोकांना स्फूर्ती देत असतात. शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने एक खास पोस्ट लिहून मोलाचा संदेश दिला आहे.

आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीची पोस्ट

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने एक खास व्हिडीओ पोस्ट केलाय. यात अश्विनीने शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची आठवण करुन दिली आहेच शिवाय सर्वांना एक खास संदेश दिलाय. अश्विनी लिहिते, "350 वर्षां पूर्वी आजच्या दिवशी रायगडावर 32 मण सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होवुन, राजांनी आलम दुनियेला एक जबर संदेश देऊन जरब बसवली. शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी रायगडी तर जाच पण आपल्या जवळच्या एका पुरातन मंदिरात एक दिवा लावून आपण हा दिन विशेष साजरा करूया.. शिवराज्यभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा..."

अश्विनी महांगडेचं वर्कफ्रंट

'आई कुठे काय करते'  या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. काही दिवसांपूर्वीच अश्विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून तिने मुंबईत नवीन घर खरेदी केल्याचं म्हटलं होतं. त्यानिमित्त अनेक कलाकारांनी कमेंट करत अश्विनीला शुभेच्छा दिल्या आहेत. अश्विनी सध्या पुण्यश्लोक अहिल्याबाई या सिनेमाचं शूटींग करत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्र्वादी कॉंग्रेसच्या प्रचारसभांमध्ये अश्विनी जोरदार भाषण करताना दिसून आली.

 

Web Title: actress ashvini mahangade post for shivrajyabhishek 350th sohala shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.