ह्रतिक रोशनच्या 'सुपर 30' मध्ये झाली या अभिनेत्याची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 13:23 IST2018-03-19T11:28:17+5:302018-03-20T13:23:30+5:30
सध्या ह्रतिक रोशन त्याचा आगामी चित्रपट 'सुपर 30' घेऊन चर्चेत आहे. ह्रतिक या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही ...
.jpg)
ह्रतिक रोशनच्या 'सुपर 30' मध्ये झाली या अभिनेत्याची एंट्री
स ्या ह्रतिक रोशन त्याचा आगामी चित्रपट 'सुपर 30' घेऊन चर्चेत आहे. ह्रतिक या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते. यापैकी एका फोटोमध्ये तो पापड विकताना दिसला होता. यात तो रस्त्यावर पापड विकताना दिसत होता. दाढी आणि केस वाढलेल्या अंदाजात हृतिक दिसत होता.
या चित्रपटातून टीव्ही अभिनेत्री मृणाल ठाकूर ह्रतिकच्या अपोझिट दिसणार आहे. सुपर 30 मध्ये आणखीन एक टीव्ही कलाकाराची एंट्री झाली आहे. नंदीश संधू यात ह्रतिकच्या भावाची भूमिका साकारणार आहे. नंदीश 'उतरन' या लोकप्रिय मालिकेत दिसला होता. नंदीशचा हा चित्रपट बॉलिवूड डेब्यू असणार आहे. नंदीश कस्तूरी, ख्वाहिश, कयामत, हम लडकिया या सारख्या अनेक मालिकांमध्ये दिसला होता.
हा चित्रपट पाटणाच्या आनंद कुमार याच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी १९९२मध्ये गणित हा विषय शिकवायला सुरवात केली होती त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला महिना ५०० रुपये देऊन भाड्याच्या खोलीत शिकवायला सुरवात केली होती पण नंतरच्या २ वर्षातच त्याच्याकडे २ विद्यार्थ्यांपासून ३६ विद्यार्थी झाले आणि नंतर त्याच्याकडील विद्यार्थ्यांची संख्या ५०० वर गेली नंतर या गोष्टी रून प्रेरित होऊन त्यांनी 'सुपर३०' ची सुरवात केली. आनंद कुमार बिहारात सुपर ३०' नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. आनंद कुमार यांच्या या कार्यात त्यांचा भाऊ प्रणव कुमार देखील त्यांना मदत करतात. पुढच्या वर्षी 25 जानेवरीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.