हा अभिनेता बनला फिटनेस गुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 15:59 IST2016-11-10T15:59:53+5:302016-11-10T15:59:53+5:30
मालिकेच्या सेटवरच कलाकारांचे अनेक तास जात असल्याने त्यांना व्यायाम करण्याचा वेळच मिळत नाही. काही अभिनेते तर रात्रीच्या वेळात जिमला ...

हा अभिनेता बनला फिटनेस गुरू
म लिकेच्या सेटवरच कलाकारांचे अनेक तास जात असल्याने त्यांना व्यायाम करण्याचा वेळच मिळत नाही. काही अभिनेते तर रात्रीच्या वेळात जिमला जातात तर काही जण केवळ सुट्टीच्या दिवशी जिममध्ये तोंड दाखवतात. पण फिट राहाण्यासाठी व्यायाम करणे हे गरजेचे आहे असे जिंदगी की महेक या मालिकेत काम करणाऱ्या करण व्होराचे मत आहे. त्यामुळे तो काहीही झाले तरी व्यायाम करतो.
मालिकेच्या चित्रीकरणाला जेव्हा सरुवात झाली, त्यावेळी व्यग्र शेड्युलमुळे त्याला जिममध्ये जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्याने हळूहळू करून आपली व्यायामाची साधने सेटवरच आणून ठेवली आणि आता तर त्याने सेटवर संपूर्ण जिमच बनवले आहे. तो आता फावल्या वेळात व्यायाम करतो. एवढेच नव्हे तर तो त्याच्या सहकलाकारांनादेखील व्यायाम करण्याचे सल्ले देतो. कोणता व्यायाम कशासाठी चांगला आहे हे सांगतो. तसेच फिट राहाण्यासाठी काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही याचेदेखील मार्गदर्शन देतो. त्याचे सहकलाकारही फिट राहाण्यासाठी त्याने दिलेल्या टिप्सचा वापर करतात. करणला प्रमाणाच्या बाहेर खायला कधीच आवडत नाही. तसेच तो बाहेरचे खात नाही. त्याचे सगळे जेवण तो घरून घेऊन येतो. याविषयी करण सांगतो, "मालिकेच्या चित्रीकरणामुळे मला व्यायाम करायला मिळत नव्हता. त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. मी आता माझी व्यायामाची सगळी उपकरणे सेटवरच आणून ठेवली आहेत. तसेच व्यायाम करण्यासोबतच योग्य डाएट हा महत्त्वाचा असतो असे माझे मत आहे. त्यामुळे मी घरून डबा घेऊन जातो. माझ्या डब्यात ओट्स, फळं, अंडी, चिकन यांसारख्या गोष्टी नेहमी असतात."