अभिनेता सचित पाटीलचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:23 PM2021-10-29T12:23:46+5:302021-10-29T12:24:11+5:30

अभिनेता सचित पाटील छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Actor Sachit Patil's comeback on the small screen will be seen in a different role | अभिनेता सचित पाटीलचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

अभिनेता सचित पाटीलचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

googlenewsNext

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेता सचित पाटीलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आता तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच दाखल होणारी मालिका अबोलीमध्ये दिसणार आहे. या मालिकेत सचित पाटील इन्सपेक्टर अंकुशी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. सचितला याआधी ग्लॅमरस रुपात आपण पाहिलं आहे. त्यामुळे अबोली मालिकेतला त्याचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

स्टार प्रवाहवर २३ नोव्हेंबरपासून नवीन मालिका अबोली प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना सचित म्हणाला, ‘मी खूपच उत्सुक आहे. स्टार प्रवाह सारख्या नंबर वन वाहिनी सोबत काम करताना खूपच आनंद होतो आहे. मी पहिल्यांदाच स्टार प्रवाहसोबत काम करतोय. मी स्टार प्रवाहचा खूप मोठा चाहता आहे. मी सगळ्या मालिका आवर्जून पहातो. लिखाणाच्या दर्जापासून कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टी मला भावतात. त्यामुळे खूप दिवसांपासून या कुटुंबाचा भाग होण्याची इच्छा होती. अबोली मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आलाय.

तो पुढे म्हणाला, या मालिकेत मी इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मी माझ्या करिअरच्या पहिल्या सिनेमात पोलिसाची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता अबोली मालिकेत मी पुन्हा खाकी वर्दी परिधान करणार आहे. मालिकेचा विषयही खूप छान आहे. अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे. छोट्या पडद्यामुळे तुम्ही दररोज प्रेक्षकांच्या घरात पोहोचता त्यांच्या कुटुंबाचा भाग होता. अबोली मालिकेच्या निमित्ताने माझी प्रेक्षकांशी नेहमी भेट होईल त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.’ 

Web Title: Actor Sachit Patil's comeback on the small screen will be seen in a different role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.