थिएटरमुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो- अभिनेत्री निलू वाघेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 10:57 IST2017-02-27T05:27:39+5:302017-02-27T10:57:39+5:30
छोट्या पडद्यावर गाजलेल्या दिया और बाती हम ही मालिका नव्या ढंगात आणि नव्या रुपात रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘तू ...

थिएटरमुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो- अभिनेत्री निलू वाघेला
'दिर और बाती हम' मालिकेचा दुसरा सीझन सिक्वेल रुपात लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. किती एक्साईटमेंट आहे ?
'दिया और बाती हम' मालिकेनं रसिकांना अलविदा केल्यानंतर काळ खूप कठीण होता. मात्र आता सात महिन्यांनंतर ही मालिका नव्या रुपात नव्या ढंगात छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे याचा अतिशय आनंद होत आहे. ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली होती.मालिकेवर आणि मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखेवर रसिकांनी भरभरुन प्रेम केलं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहोत याचा आनंद होतोय. पहिला सीझन संपल्यानंतर रसिक पत्र आणि ईमेल पाठवून मालिकेचा सिक्वेल घेऊन यावा अशी विनंती करत होते.आता सिक्वेल रुपात रसिकांच्या भेटीला येत असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करु.
दुस-या सीझनमध्ये काय वेगळेपण असेल ? पहिला सीझन जिथे संपला तिथूनच सिक्वेलची सुरुवात होईल का ?
'दिया और बाती हम' मालिकेचा नवा सीझन अर्थात सिक्वेल रोमांचक असेल. या सिक्वेलची कथा केरळच्या बँकड्रॉपवर रंगेल. तसंच यांत 20 वर्षाचा लीप दाखवण्यात येणार आहे. सूरज आणि संध्याच्या मृत्यूनंतर मालिकेची कथा 20 वर्षांनी पुढे जाईल. सिक्वेलमध्ये अनेक पॉजिटिव्ह गोष्टी रसिकांना पाहायला मिळतील. मालिकेची थीम पॉजिटिव्ह आहे. या मालिकेत अनेक ट्विस्ट असतील आणि रसिकांना ते नक्कीच आवडतील. मात्र सेटवर दीपिका आणि अनस यांना मी खूप मिस करेन. मात्र लाइफ मस्ट गो ऑन. जे कुणी सिक्वेलमध्ये नवे असतील त्यांचा चार्म काही वेगळाच असेल.
दुस-या सीझनमध्ये भाभो किती बदलली आहे आणि कुटुंबातील इतर सदस्यांमध्येही काय बदल असणार आहे?
'दिया और बाती' हम हा माझा पहिला असा शो आहे की ज्याने इतकी लोकप्रियता मिळवली. रसिकांच्या प्रेमामुळे आणि लोकप्रियतेमुळे या मालिकेतील व्यक्तीरेखा कायम लक्षात राहतील. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे पुन्हा एकदा नवी मालिका नाही तर भाभोच्या रुपातच रसिकांसमोर येत आहे. तुमची भाभो काही बदललेली नाही. तिचं फक्त वय वाढलं आहे. तिचा ऍटिड्यूड, राग तसाच असला तरी लूकमध्ये बदल पाहायला मिळेल. चष्मा लावणं मला फार आवडत नाही. मात्र सारं काही नैसर्गिक वाटावं म्हणून लूक बदलण्यात आलाय. मग लेंहग्याच्या जागी साडी आणि चष्मा आला. तसंच या मालिकेतील कुटुंब तेच असले तरी त्यातील चेहरे बदलले आहेत.
तुमच्या अभिनय कारकिर्दीत थिएटरचं काय योगदान आहे ?
थिएटरशी असलेले नातं आजही कायम आहे याचा मला अभिमान आहे. माझ्यात आजही काही बदल झालेला नाही. थिएटरची पार्श्वभूमी असलेले कलाकार थिएट्रीकल अॅक्टींग करतात असं बोललं जाते. मात्र माझ्या मते थिएटरमुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो.त्यांच्या अभिनय क्षमतेला नवे पैलू पडतात. सध्याचे थिएटर खूप नॅचरल आहे. त्यामुळे कॅमे-याची भीती राहत नाही.तुमच्यात जिद्द असेल तर मग सोने पे सुहागाच.
भाभोची भूमिका साकारत असताना वैयक्तीक जीवन कसं आहे हे जाणून घ्यायला आवडेल?
मला दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी.ज्यावेळी मी घरी जाते आणि तेव्हा हे सामान असं का ठेवलं आहे.असे सामान अस्ताव्यस्त का पसरलंय असं मी बोलते. तेव्हा माझी मुलं मला म्हणतात की मम्मी आता तू घरी आहेस. आता तू भाभो नाहीस त्यामुळे त्या भूमिकेतून बाहेर ये असे ते मला सांगतात.