मिलिंद गवळींनी सांगितली सुचित्रा बांदेकर यांच्याविषयीची खास आठवण, म्हणाले- "वीस-बावीस वर्षांपूर्वी आम्ही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 11:51 IST2025-09-21T11:42:01+5:302025-09-21T11:51:20+5:30
मिलिंद गवळींनी सुचित्रा बांदेकर यांच्याविषयीची आठवण जागवली आहे. काय म्हणाले?

मिलिंद गवळींनी सांगितली सुचित्रा बांदेकर यांच्याविषयीची खास आठवण, म्हणाले- "वीस-बावीस वर्षांपूर्वी आम्ही..."
मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर सुचित्रा बांदेकर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करुन मिलिंद यांनी जुनी आठवण जागवली आहे. मिलिंद गवळी लिहितात, ''असं म्हणतात की आयुष्याचा वेळ कसा पटकन निघून गेला हे जर तुम्हाला कळलंच नाही तर याचा अर्थ असा की तुम्ही तुचं आयुष्य छान जगलात किंव्हा जगत आहात, अनेक वेळा आपण म्हणतो अरे हे वर्ष कसं पटकन निघून गेलं काही कळलं नाही, तर मला असं वाटतं की त्या वर्षामध्ये तुम्ही खूप खूप मन लावून कामं केली आहेत किंवा तुम्ही खूप Involve होऊन जगला आहात, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सातत्याने अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे तुम्हाला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही आणि महिने वर्ष सरून गेली.''
''आज-काल आमचं "मन पसंत की शादी चं शूटिंग फिल्म सिटीला सुरू आहे. रोज मी फिल्म सिटीच्या गेट मध्ये शिरलो की मला १९८४ मध्ये फिल्मसिटीच्या रस्त्यावर "हम बच्चे हिंदुस्थान के"चं शूटिंग आठवतं , त्या सिनेमा क्षेत्राचं आणि या फिल्मसिटीचं नातं इतक्या वर्षाचं आहे, हे खरं वाटत नाही, इतकी वर्ष कशी करून गेली कळलंच नाही, या क्षेत्रात तितका रमून गेलो होतो, की काळ कसा पुढे सरकत गेला कळलंच नाही.''
"मनपसंत की शादी" च्या सेटवर शारदा च्या भूमिकेत सुचित्रा बांदेकर या आहेत, वीस-बावीस वर्षांपूर्वी रत्नाकर मस्करी यांच्या "गहिरे पाणी"च्या "काळी बाहुली" या गोष्टीमध्ये पहिल्यांदा आम्ही एकत्र काम केलं होतं, त्यात माझे आणि सुचित्राचे अनेक सीन्स छान झाले होते, "मनपसंत की शादी" मध्ये सुद्धा आमचे सीन्स मस्त झालेत, त्या दोन वेगळ्या गोष्टी मधल्या परफॉर्मन्स मधला काळ जो निघून गेला आहे तो दोन दशकांपेक्षाही जास्तचा आहे. पण परफॉर्म करताना त्याची कुठेही जाणीव होत नाही.
आजकाल तर मला सारखा असं वाटतं कोणत्याही शूटिंग सेटवर सह कलाकार, किंवा युनिट मधले सहकारी packup झाल्यानंतर पुन्हा किती वर्षांनी त्यांची भेट होईल कोणालाही सांगता येणार नाही.''
''पुन्हा त्या कलाकाराची भेट होईल की नाही हेही सांगता येत नाही, माझ्या या इतक्या वर्षाच्या कारकीर्दीत असे असंख्य सहकलाकार आणि तंत्रज्ञ आहेत, ज्यांच्या बरोबर आधी खूप भारी सीन्स केले होते, अतिशय सुंदर उत्कृष्ट सिनेमे मी केले होते, त्यांच्याबरोबर काम करून खूपच छान वाटलं होतं, छान परफॉर्मन्स केल्याचं समाधान मिळालं होतं, पण या प्रवासामध्ये पुन्हा त्यांची कधीच भेट झाली नाही. ''
''अशा वेळेला वाटतं की आपण निर्माता किव्हां दिग्दर्शक व्हावं आणि अशा असंख्य उत्कृष्ट कलाकारांबरोबर पुन्हा नव्याने काम करावं. आता सुचित्रा बांदेकर यांच्याबरोबर काम करून मला खरच खूप समाधान मिळतं, त्यांनी शारदा शिंदे ही भूमिका छान वटवल्यामुळे माझी राजाराम शिंदे ची भूमिका खूपच Effective and Enhance होत आहेत.''