'देवमाणूस' मालिकेतील हा अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा, जाणून घ्या कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 12:50 PM2021-07-28T12:50:32+5:302021-07-28T12:51:07+5:30

'देवमाणूस' मालिकेतील या अभिनेत्याने स्वतःच एका कार्यक्रमात खुलासा केला होता.

The actor in 'Devmanus' series still drives a rickshaw, find out who he is. | 'देवमाणूस' मालिकेतील हा अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा, जाणून घ्या कोण आहे तो?

'देवमाणूस' मालिकेतील हा अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा, जाणून घ्या कोण आहे तो?

googlenewsNext

बरेच कलाकार स्टार होण्यापूर्वी सामान्य जीवन जगत असतात. जेव्हा कलाकार ही गोष्ट लक्षात ठेवून इंडस्ट्रीत वावरतात तेव्हा ते कितीही प्रसिद्धी किंवा लोकप्रियता मिळाली तरीदेखील त्यांचे पाय जमिनीवर राहतात. ‘देवमाणूस’ मालिकेतला एक कलाकार देखील असाच आहे. सध्या ‘देवमाणूस’ ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. या मालिकेतले अनेक नवे ट्विस्ट लोकांना आश्चर्याचे धक्के देत आहेत. या मालिकेतले कलाकार काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या खऱ्या आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या.

या कलाकारांमध्ये असा एक कलाकार आहे अभिनेता किरण डांगे. किरण या मालिकेत बज्याची भूमिका साकारतो आहे. जेव्हा किरणने त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या, तेव्हा बऱ्याच जणांच्या डोळ्यांत पाणी आले. मालिकेत काम करण्यापूर्वी किरण पोट भरण्यासाठी कल्याणमध्ये रिक्षा चालवतो. आज एक अभिनेता म्हणून नाव कमवूनही आज देखील ते रिक्षा चालवतात.


काही लोकांना थोडी जरी प्रसिद्धी मिळाली तरी त्यांना लगेच गुरमी येते आणि छोटी छोटी कामे करणे त्यांना लाजिरवाणे वाटू लागते. काही लोक मात्र आपल्या परिस्थितीची जाण ठेवून असतात आणि नेहमी जमिनीवर पाय ठेवून वागतात.

इंडस्ट्रीत आज किरण डांगे सारखी देखील माणसे आहेत जी आपली मुळे विसरली नाहीयेत. आणि त्यांना त्याची लाजदेखील वाटत नाही. कोणतेही काम कधीच छोटे किंवा क्षुल्लक नसते. अशी कामे केल्याने माणूस कधी लहान होत नाही. उलट कामांमध्ये कोणताही भेदभाव न करता जे लोक काम करतात, तेच आयुष्यात यशस्वी होतात. हा आदर्श किरण डांगेने समाजासमोर ठेवला आहे.

Web Title: The actor in 'Devmanus' series still drives a rickshaw, find out who he is.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.