दिग्दर्शक बनला अभिनेता !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 14:06 IST2018-04-16T07:52:01+5:302018-04-16T14:06:40+5:30

रोल..कॅमेरा..अ‍ॅक्शन.. त्यांच्या या तीन शब्दांच्या हुकमावरून सेटवरची सर्व सूत्रे हलण्यास सुरुवात होते. एखाद्या जहाजाची दिशा त्याचा कप्तान ठरवितो, त्याप्रमाणे ...

Actor became director !! | दिग्दर्शक बनला अभिनेता !!

दिग्दर्शक बनला अभिनेता !!

ल..कॅमेरा..अ‍ॅक्शन.. त्यांच्या या तीन शब्दांच्या हुकमावरून सेटवरची सर्व सूत्रे हलण्यास सुरुवात होते. एखाद्या जहाजाची दिशा त्याचा कप्तान ठरवितो, त्याप्रमाणे दिग्दर्शक हा मालिका तसेच चित्रपटाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलत असतो. दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून मालिका आकार घेत असते. पण जेव्हा हाच दिग्दर्शक मुख्य अभिनेता होतो तेव्हा ? आहे ना गमंत झी युवावर सोमवार आणि मंगळवार रात्री ९:३० वाजता प्रदर्शित होणारी गुलमोहर ही सिरीज खरंतर प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळीं हेच दिग्दर्शित करतात  पण या सोमवारची कथा थोडी हटके होती आणि त्या गोष्टीला न्याय देणारा एक चांगला अभिनेता हवा होता. जेव्हा त्यांनी ही कथा त्यांच्या युनिट ला ऐकवली तेव्हा सगळ्यांनाच मंदार देवस्थळींनी ही भूमिका करावी असे सुचवले . भूमिकेला मंदार देवस्थळी योग्य निवड आहे असे वाहिनीने सुद्धा सुचवले. मग काय दिग्दर्शकाची धुरा फ्रेशर्स फेम दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे कडे सोपवत एका अभिनेत्याच्या भूमिकेत त्या पात्राला योग्य न्याय दिला . 

ही कथा तिच्या नावाप्रमाणेच निनाद आणि सावनी यांच्या अपूर्ण प्रेमकथे भोवती फिरते, जे अचानकपणे पुन्हा एकदा भेटतात. दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी  निनाद हे पात्र रंगविले आहे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकरनेसावनीचे पात्र साकारले आहे. सावनी आणि निनाद एकाच कॉलेज मध्ये शिकत असतात, त्यांचा मित्रपरिवार देखील एकच असते. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात होत, पण शेवटपर्यंत ते दोघेही त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत नाहीत. निनाद आणिसावनीचे कॉलेज नंतर मार्ग वेगळे होतात आणि मग ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतात. निनादचे लग्न होते आणि त्याच्या सुखी परिवारात एका गोड परीचे आगमन देखील होते. सावनीदेखील तिच्या वैवाहिक आयुष्यात मग्नहोते. निनादच्या मुलीला कले मध्ये खूप रस असल्यामुळे ती चित्रकलेच्या क्लासला जात असते. एके दिवशी, जेव्हा निनादच्या बायकोला बरे वाटत नसल्यामुळे निनाद स्वतः मुलीला सोडायला जातो आणि तेव्हा त्याला कळते की तिचीड्रॉईंग टीचर दुसरी तिसरी कोणी नाही तर सावनी आहे.

Web Title: Actor became director !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.