हा अभिनेता आपल्या मालिकेसाठी बनला लेखक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 16:54 IST2016-11-10T16:54:51+5:302016-11-10T16:54:51+5:30
परदेस मैं हे मेरा दिल या मालिकेत अर्जुन बिजलानी, दृष्टी धामी, सुरेखा सिक्री प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या ...

हा अभिनेता आपल्या मालिकेसाठी बनला लेखक
प देस मैं हे मेरा दिल या मालिकेत अर्जुन बिजलानी, दृष्टी धामी, सुरेखा सिक्री प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणात कोणतीही कमतरता भासू नये असे या टीमच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मालिकेच्या महत्त्वाच्या भागांचे चित्रीकरण नुकतेच ऑस्ट्रीया येथे करण्यात आले. या मालिकेत अर्जुन राघव ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत तो एका रॉमँटिक हिरोच्या भूमिकेत आहे. याआधी अर्जुनने नागिन या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. आता परदेस में है मेरा दिल या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना अधिकाधिक आवडावी यासाठी तो स्वतः खूप मेहनत घेत आहे. त्याचा कॉमेडी सेन्स आणि कॉमेडीची टायमिंग खूपच चांगली आहे. तो त्याच्या खऱ्या आयुष्यातही सगळ्यांना हसवत असतो. त्याचे सहकलाकार तर त्याच्यासोबत प्रचंड खूश असतात. कारण त्यांना तो नेहमीच काही ना काही तरी जोक्स सांगत असतो. त्याची परदेस में है मेरा दिल या मालिकेतील भूमिका चांगली व्हावी यासाठी तो मालिकेच्या लेखकांना मदत करतोय. संवादात एखादा चुटकुला अथवा एखादी म्हण टाकून तो संवाद तो अधिक रंजक बनवत आहे. यामुळे त्याची भूमिका अधिक चांगली होत आहे. याविषयी अर्जुन सांगतो, "या मालिकेतील माझा रोल मला खूप आवडत आहे. माझी व्यक्तिरेखा पाहाताना लोकांना मजा यावी अशी माझी इच्छा आहे. मी माझ्या लेखकांच्या टीमला माझ्या संवादांसाठी मदत करतोय, हे लिखाणाचे काम मी खूप एन्जॉय करत आहे."